पुणे: शहरात मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमुळे डेक्कन जिमखाना आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रॅलीच्या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
रॅलीचा मार्ग आणि वेळेचे नियोजन: तिरंगा रॅलीचा प्रारंभ दुपारी दोनच्या सुमारास फर्ग्युसन रस्त्यावरील ललित महल हॉटेल चौकातून होणार आहे. त्यानंतर ही रॅली श्री ज्ञानेश्वर पादुका चौक, श्री तुकाराम महाराज पादुका चौक, गोखले स्मारक चौक (गुडलक चौक) आणि गरवारे चौक या प्रमुख मार्गावरून जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी काही तात्पुरते बदल जाहीर केले आहेत.
वाहतुकीतील महत्त्वाचे बदल आणि पर्यायी मार्ग:
-
स्वारगेट ते डेक्कन: स्वारगेटहून टिळक रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी सारसबाग, दांडेकर पूल, म्हात्रे पूल, नळस्टॉप चौक आणि लॉ कॉलेज रस्त्याचा वापर करावा.
-
स्वारगेट ते जुना मुंबई-पुणे रस्ता: स्वारगेटहून डेक्कनमार्गे जाणाऱ्या वाहनांनी पूरम चौक, बाजीराव रस्ता आणि वेधशाळा चौकाचा मार्ग निवडावा.
-
कर्वे रस्ता: कर्वे रस्त्यावरून खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.
-
गरवारे चौक ते वाकडेवाडी: गरवारे चौकातून फर्ग्युसन रस्त्याने वाकडेवाडीकडे (वीर चापेकर चौक) जाणाऱ्या वाहनचालकांनी शेलारमामा चौक, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्याचा वापर करणे अपेक्षित आहे.
याव्यतिरिक्त वाहनचालक भांडारकर रस्ता, बीएमसीसी रस्ता आणि सेनापती बापट रस्त्याचा वापर करून आपापल्या गंतव्य स्थानी पोहोचू शकतात. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




