
सातारा : मराठा आरक्षणासाठी लेकरं उन्हात आहेत तुमच्याबरोबर मी देखील उन्हात आहे. घाबरून घरात बसलो तर आरक्षण कसे मिळणार? 70 वर्षापासून पिढ्या बरबाद झाल्या. आरक्षण असतानाही आरक्षण मिळाले नाही. मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केले आहे. 70 वर्षांचा आमचा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार आहे. आरक्षण असताना आम्हाला का दिलं गेलं नाही? आमच्या लेकरांनी असं काय पाप केलं असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे.
|
|
मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या मनोज जरांगेंच्या सभांचा धडाका सध्या सुरुच आहे. दरम्यान आज जरांगेंची साताऱ्यात सभा झाली. या सभेला सातारा शहराबरोबर पंचक्रोशीतील मराठा बांधव हजर होती. दरम्यान आज साताऱ्याचे खासदार छ. उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचीही मनोज जरांगे भेट घेणार आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जाणून बुजून षडयंत्र रचले जात आहे. आंदोलनानंतर आता पुरावे मिळायला लागले. 70 वर्षापूर्वी आरक्षण दिले असते तर आज ही वेळ आली नसती. आज मराठ्यांच्या लाखाने नोंदी सापडायला लागल्या आहेत. मराठ्यांना लढायचे माहिती आहे. त्यावेळी पुरावे नाही सापडत म्हणाले आता पुरावे कसे सापडायला लागले. ज्याने लपवले त्यांची नाव समोर आले पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.
24 डिसेंबरला आपला विजय निश्चित : जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, 24 डिसेंबरला आपला विजय निश्चित आहे. मराठ्यांनो गाफिल राहू नका. नाहीतर लेकरांचे नुकसान करायला तुम्ही जबाबदार असाल. हैदराबादला समिती नोंदी शोधण्यासाठी गेली. या समितीचा सरकारने अहवाल स्विकारला. ज्या नोंदी मिळतील त्यांना obc मध्ये आरक्षण मिळणार आहे. परंतु मी दोन भावांमध्ये भेद करू शकत नाही, एका भावाला खूश आणि दुसऱ्याला नाखूश करून चालणार नाही. साताऱ्यात 20 हजार नोंदी सापडल्या आहेत.यातच आपले यश आहे. नोंदी नसतील त्याच नोंदीच्या अहवालावर 24 तारखेला सरसकट आरक्षण देणार सांगितले म्हणून उपोषण मागे घेतले. माझा काहीही स्वार्थ नाही.
घटनेच्या पदावर बसलेल्याने कायदा तुडवला : जरांगे
मराठा आरक्षणाचा लढा आपल्यालाच लढायचे आहे. जेवढे पक्ष झाले त्या पक्षातील एकही नेता मदतीला यायला तयार नाही. त्या नेत्यांना मराठ्यांनी किंमत द्यायची नाही. घटनेच्या पदावर बसलेल्याने कायदा तुडवला आहे, त्याची लायकी नाही. माझ्या टप्प्यात आला की वाजवतो, असे म्हणत जरांगेंनी छगन भुजबळवर टीका केली आहे. महाराष्ट्रालायशवंतरावानी वेगळी संस्कृती दिली.महात्मा फुलेंचा आदर्श ठेवायला पाहिजे होते. मराठा आणि obc मध्ये तेढ निर्माण होऊ देऊ नका. तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. जातीय दंगली घडवून आणायचा डाव आहे, असे जरांगे म्हणाले.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



