हवामान बदलाच्या विरोधात संपूर्ण जग एक लढा देतआहे. या संघर्षात ध्येये आणि वचनबद्धतेची कोणतीहीकमतरता राहिलेली नाही. पण शेवटी लोक या दिशेनेझालेली प्रगती या आधारावर मोजतात की ते त्यांच्यादैनंदिन जीवनात काय अनुभवतात आणि हवामानकृतीचा प्रभाव जगातील शहरांत जास्त थेट दिसून येतो. शहरांमध्ये आता ही समज निर्माण होऊ लागली आहेकी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणारे आणिहवामानविषयक आव्हानांचा सामना करण्याची क्षमतावाढवणारे उपाय लोकांचे दैनंदिन जीवनही अधिकचांगले बनवतात. ऊर्जा-कार्यक्षम घरे विजेचे बिल कमीकरतात. अक्षय ऊर्जा आयातित-इंधनांवरीलअवलंबित्व आणि तेल-गॅसच्या किमतीत होणारी वाढयामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करते. उत्तमसार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षित सायकल पायाभूत सुविधा लोकांना येण्या-जाण्यासाठी अधिककिफायतशीर आणि निरोगी पर्याय उपलब्ध करून देतात. झाडे आणि ग्रीन बेल्ट हवेच्या गुणवत्तेत सुधारणाघडवून आणतात, परिसर थंड ठेवतात आणि शहरे राहण्यासाठी अधिक सुखद बनवतात. पण हवामान कृतीचा उद्देश केवळ एवढाच नाही. हा उष्ण होतअसलेल्या पृथ्वीच्या आधीच स्पष्ट झालेल्याप्रभावांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्याचाही प्रयत्न आहे.उष्णतेची लाट, पूर, दुष्काळ आणि अति-हवामानाच्याघटना सतत अधिक तीव्र होत आहेत. शहरे आणि त्यांचेरहिवासी या आव्हानांचा सर्वात आधी सामना करतआहेत. म्हणूनच हवामान बदलाचा सामना करण्यासाठीअनुकूलतेच्या उपायांची साखळी पुढे वाढवावी लागेल. जगभरात स्थानिक नेतृत्व शाळा, रुग्णालये, नर्सिंगहोम्स आणि सार्वजनिक ठिकाणे अति उष्णता तसेचइतर हवामान धोक्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठीअनुकूल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सावलीचीव्यवस्था, ग्रीन रूफ आणि नैसर्गिक कूलिंग सिस्टिम्सवाढत्या तापमानाप्रति शहरांची क्षमता वाढवू शकतात,ज्याचा सर्वात जास्त लाभ मुले, वृद्ध आणि इतरसंवेदनशील गटांना मिळतो. आज जगातील अनेकमोठ्या शहरांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन घटले आहे,तर त्यांची लोकसंख्या सतत वाढत राहिली आहे.याशिवाय, सर्व प्रकारची शहरे मिळून त्या प्रगतीलाअधिक वेगवान करण्यासाठी सहकार्य करत आहेत, जीत्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर साध्य केली आहे. गेल्या दशकात ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स फॉरक्लायमेट अँड एनर्जी (जीसीओएम) 150 देशांच्या14,000 पेक्षा जास्त शहरे आणि स्थानिक सरकारांच्यायुती म्हणून विकसित झाले आहे, जे एक अब्जापेक्षाजास्त लोकांचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये भारताचीही 29शहरे सामील आहेत आणि सर्वात नवीन सदस्यतिरुवनंतपुरम आहे. याच्या अनेक सदस्य शहरांनीत्यांच्या सरकारांच्या तुलनेत अधिक महत्त्वाकांक्षीहवामान ध्येये स्वीकारली आहेत आणि ती अधिकवेगाने साध्य करण्याच्या दिशेने पुढे गेली आहेत. तरीही,जर त्यांना अधिक सहकार्य मिळाले तर ती अधिकवेगाने आणि अधिक व्यापक स्तरावर काम करूशकतात. त्यांना तांत्रिक तज्ज्ञता आणि निधीपर्यंतपोहोचण्याची तातडीची गरज आहे. अनेक स्थानिकस्वराज्य संस्थांकडे अजूनही इतकी संसाधने नाहीत कीत्या हवामान प्रकल्पांची ओळख, विकास आणिअंमलबजावणी करू शकतील. भागीदारीतून या गरजापूर्ण करता येऊ शकतात. सिटी क्लायमेट फायनान्स गॅपफंड - ज्याला जीसीओएम आणि जागतिक बँकेचापाठिंबा प्राप्त आहे - आधीच अशा प्रकल्पांचा विकासकरण्यासाठी शहरांना मदत करत आहे, जे गुंतवणुकीलाआकर्षित करू शकतील आणि लोकसंख्येला लाभपोहोचवू शकतील. गेल्या काही वर्षांत याने 1,400 पेक्षाजास्त शहरांना हवामानविषयक महत्त्वाकांक्षांनाव्यावहारिक कृतीत बदलण्यास मदत प्रदान केली आहे. राष्ट्रीय सरकारे आता हवामान बदलाचा सामनाकरण्यात शहरांची क्षमता वेगाने स्वीकारत आहेत. पणयाला केवळ सुरुवात मानले पाहिजे. सर्वात यशस्वीहवामान-धोरणे तीच असतात, ज्यांचा परिणाम लोकत्यांच्या रोजच्या जीवनात पाहू आणि अनुभवू शकतात,म्हणजे स्वच्छ हवा, अधिक सुरक्षित रस्ते, विजेचे कमीबिल, अधिक आरोग्यदायी घरे आणिअति-हवामानापासून अधिक चांगली सुरक्षा. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) लोक रोजच्या जीवनात अनुभवू शकतात.तिच खरी हवामान धोरणे म्हटलीपाहिजेत. म्हणजे स्वच्छ हवा, सुरक्षित रस्ते,विजेचे कमी बिल, अधिक आरोग्यदायीघरे,तीव्र हवामानापासून चांगली सुरक्षा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
- जालना: ११२३ दिवस अन् ११ उपोषणे!; जेथून मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारला, तो ऐतिहासिक मांडप आणि स्टेज अखेर काढला!
- बीड: हादरवणारी बातमी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरी संपवले जीवन
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




