‘काजवा’ या आत्मकथनात मराठवाड्यातील आडबाजूच्या, कसल्या सोयीसुविधा नसणाऱ्या खेड्यातील उसतोड कामागारांचा मुलगा ते माध्यमिक व तांत्रिक शिक्षणाधिकारी असा लेखकाचा संघर्षमय प्रवास प्रवाहीपणे उलगडत जातो. त्यांचा हा प्रवास अर्थातच काटेरी मार्गावर चालत, अनंत अडचणींवर मात करून झाला आहे. या कथनाला कोठेही आत्मकेंद्री प्रौढीचा दर्प नाही, कसलेही कडवट मतप्रदर्शन नाही किंवा दु:खाचा बाजार मांडणे नाही. एकाच वेळी स्वीकारशील व संघर्षतत्पर आयुष्याचे हे बेमालूम मिश्रण आहे. जन्माचा दाखला नसल्याच्या कारणावरून ज्या शाळेने प्रवेश नाकारला, शिक्षणाधिकारी झाल्यावर त्याच शाळेच्या तपासणीचे काम लेखकाकडे येते व या प्रसंगातून आत्मकथनास सुरुवात होते. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना शिक्षणाचे महत्त्व ओळखून आईवडील मुलाला शाळेत दाखल करतात, परगावी ठेवतात. खस्ता खाऊन उधारउसनवाऱ्या करून, अपमान-अवहेलना सहन करून पैसे पाठवत राहतात. पिढ्यानपिढ्या ऊस तोडता तोडता, आपल्याप्रमाणेच मुलाच्याही आयुष्याचे चिपाड होऊ नये, हा यामागे विचार असतो. नात्यांतही गरीब-श्रीमंत असते, हा धडा बालवयातच लेखकाला मिळतो. परिस्थितीच्या रेट्यामुळे जगण्यासाठी लागणारी ‘सॅाफ्ट स्किल्स’(स्वयंपाक, शिवणकाम,इ.) लहान वयातच शिकणे लेखकाला भाग पडते. चुकून धक्का लागून गुंडाच्या बाटलीतील दारूची सांडलवंड झाल्याने कष्टाने कमावलेले पीठ त्याला भरून द्यावे लागते आणि त्यामुळे तिसरी-चौथी इयत्तेतील लेखकला उपाशी झोपावे लागते. हा प्रसंग अत्यंत हेलावणारा आहे. तो सहजपणे सांगितला जातो. शिक्षक - मुख्याध्यापक - उपशिक्षणाधिकारी - प्राचार्य - गटशिक्षणाधिकारी - शिक्षणाधिकारी असा लेखकाचा चढत्या क्रमाने झालेला प्रवास अनुभवसंपन्न आहे. शिक्षण घेत असतानापर्यंतचे आयुष्य अभावग्रस्ततेने व्यापले असले, तरी लेखकावर झालेल्या खोल मूल्यसंस्कारांचा पाया याच काळात पक्का झाला आहे. नोकरीच्या काळात अवडंबर न माजवता, मूल्ये जपण्याचा अट्टाहास त्याच पायावर उभा आहे. ‘खोटी कागदपत्रे दाखवून बोगस शिक्षकभरती’ची सत्यकथा वाचताना ‘निशाणी डावा अंगठा’ आठवत राहतो. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेत प्रामाणिकपणाचा दिवा सांभाळण्याबाबत मराठे नावाच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीचा प्रसंग किंवा जिल्हा परिषदेतील राजकारणापायी भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांमध्ये गोवण्याचा प्रयत्न - या घटनांमधून लेखकाच्या सचोटीवर शिक्कामोर्तब होते. सडलेल्या व्यवस्थेवर अंत:स्थ व्यक्तीकडून सूक्ष्मपणे केले जाणारे भाष्य वर्मावर अचूक बोट ठेवणारे आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणारे प्रयोगशील अभिनव उपक्रम सातत्याने राबवत राहणे, हे लेखकाच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. ते लेखकाच्या समाजाभिमुख वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे. वेगवेगळ्या गावांत लेखकाच्या संकल्पनेतून राबवल्या गेलेल्या ‘बिनपैशाचा उपक्रम’, ‘कृतियुक्त अध्ययन’, ‘शाळाबाह्य मुलींचे शिक्षण’, ‘शाळा तिथे संगणक’, ‘विद्यार्थी अपघात विमा’, ‘चावडीवाचन’, ‘निसर्गशाळा’, ‘गुणवत्ता विकास कार्यक्रम’ अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय रितीने वाढली, तसेच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत झाली. अनेकदा अल्पवयीन मुलामुलींच्या लग्नासाठी सामाजिक, आर्थिक कारणांसाठी कित्येकदा पालकांकडून दबाव आणला जातो. त्यामुळे अनेक मुलांचे शिक्षण कायमचे बंद होते. या बहुपदरी समस्येचे निराकरण करणेही लेखकाला आवश्यक वाटते. लेखकाची ‘माणूस’ म्हणून झालेली जडणघडण दर्शवणारे अनेक प्रसंग पुस्तकात येतात. साठवलेल्या पैशांची रूम पार्टनर चोरी करतो, पण ते पैसे त्याला सैन्यात भरती होण्यासाठी उपयोगी पडल्याचे कळल्यावर लेखकाची तगमग शांतावते. लग्नानंतर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लेखकाची एकंदर परिस्थिती पाहून सुरुवातीला सासरच्या मंडळींना काही शंका असणे स्वाभाविक होते. त्यावेळी त्यांचे मेहुणे शहाजी यांचा लेखकाला पाठिंबा होता. लेखकाचे बंधूही न्यायाधीशपदावर विराजमान झाले. वयोवृद्ध पित्याला स्वप्नातील विमान प्रवास घडवताना आणि हवाईसुंदरीच्या हातचा ‘पाणी फुळूक’ चहा पाजतानाचा प्रसंग एकाचवेळी गमतीशीर आणि हृदयस्पर्शी झाला आहे. माणसं कशीही असली, तरी शेवटी त्यांच्या चांगुलपणावर लेखकाचा विश्वास आहे. ‘थोडा है थोडे की जरूरत है, जिंदगी फिरभी यहा, खूबसूरत है’ यावर लेखकाचा गाढ विश्वास आहे. गुरुवर्य एल. के. कुलकर्णींच्या काव्यपक्तींमध्ये लेखकाच्या आत्मकथनाचे सार सामावले आहे... ‘कबूल आम्ही असू काजवे, प्रकाश इवला आमचे भूषण उधार घेऊन प्रकाश कृत्रिम मग चमचमणे कधी न जमले शिड्या भिकेच्या हातात घेऊन वरती चढणे कधी न जमले’ काजवा स्वयंप्रकाशित असतो आणि अंधाऱ्या रात्री स्वतःच्या प्रकाशात वाट शोधतो. त्याचा प्रकाश डोळे दिपवून टाकणारा लखलखीत नसला, तरी इतरांनाही वाट दाखवणारा आश्वासक दिलासा त्यात नक्कीच असतो. निराशेच्या अंधारवाण्या रात्री उजळून टाकण्यासाठी लेखकासारख्या काजव्यांचे थवे निरंतर कार्यरत असतात - स्वतःला आणि कळतनकळत समाजाला वाट दाखवण्यासाठी. पुस्तकाचे नावः काजवा
लेखकः पोपट श्रीराम काळे
प्रकाशकः मनोविकास प्रकाशन
मूल्यः ₹ ३५०/-
पृष्ठसंख्याः २७२
प्रथम आवृत्तीः १८ जून २०२२ संबंधित वृत्त बुक रिव्ह्यू:'पुस्तके साद आणि दाद'मध्ये मुखापासून उगमाकडे जाणारा प्रवास; मूळ साहित्यकृती वाचायला येतो हुरूप! 'वसुंधरेचे शोधयात्री':साहसी दर्यावर्दींचा चित्तथरारक इतिहास मांडणारे लेखक डॉ. अनुराग लव्हेकर यांची मुलाखत, ऐका आणि पाहा VIDEO https://link.divyamarathi.com/lHdELfz6JPb
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




