भौतिक सुख आणि सुविधा म्हणजे आपल्या सांसारिक जीवनाला अधिक आरामदायक, सोयीस्कर आणि सुलभ बनवणारे भौतिक घटक, जसे की निवास, बंगला, गाडी, पंखा, फ्रीज, उत्तम अन्न आणि कपडे. या सामान्य आवश्यकतेच्या वस्तू आहेत. परंतु त्या अधिक किमतीच्या आणि त्यात अधिक सोय असलेल्या असा हट्ट पुर्वक मानसिक आग्रह असणे यामुळे मानसिक शांतता भंग होते आणि वास्तविक आनंद मिळत नाही. या गोष्टी तात्पुरता शारीरिक आराम आणि आनंद देतात, परंतु त्या शाश्वत किंवा कायमस्वरूपी आंतरिक आनंदाची हमी देऊ शकत नाहीत. म्हणूनच कुठेतरी अंतरिक आनंदाची आवश्यकता भासते आणि त्यावर विचार करणे गरजेचे ठरते. खरा आणि अधिक वेळ टिकणारा आनंद संतोष वृत्तीतून येत असतो. जे काही उपलब्ध आहे त्यात सुख आणि समाधान मानणे हिताचे ठरते. आपली कुवत नसलेल्या किमतीच्या वस्तू मिळवण्यासाठी माणूस अन्य प्रकारे प्रयत्न करत असतो. यातूनच अनैतिकतेचा जन्म होतो. भौतिकतेवर आधारित जीवनशैलीचा अधिक अवलंब आणि त्या सुविधांचा संग्रह यातूनच निर्दयता, अनैतिकता, स्वार्थ, अशा वृत्ती जन्माला येतात. वर्तमान काळानुसार शारीरिक गरजा पूर्ण करणे जसे की अन्न, निवारा आणि आरामदायी जीवनमान त्यात मोबाइल, गाडी, ए.सी., फ्रिज, उत्तम घर इत्यादींचा समावेश होतो. परंतु यापासून मिळणारी, अशा प्रकारची भौतिक सुखं मर्यादित काळासाठी आनंद देतात; एकदा या भौतिक वस्तूंच्या वापराची अती सवय झाली की त्यातील आनंद दिवसेंदिवस कमी होतो. म्हणूनच माणूस भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी अन्य प्रकारे वस्तूंच्या प्राप्तीच्या शोधात अनैतिक, वाम का मग मार्गाचा अवलंब करत असतो. 'सुविधा' याचा अर्थ म्हणजे साधन (उदा. पंखा), तर 'सुख' म्हणजे त्या साधनामुळे मिळणारा मानसिक आनंद किंवा समाधान. भौतिक सुविधा गरजेच्या आहेत, परंतु त्या एका मर्यादेपर्यंत असाव्यात. वास्तविक पाहता सुखी आयुष्यासाठी मानवी मूल्ये जसे की विश्वास, आदर, प्रेम करुणा, दया संतोष वृत्ती हे जसे महत्वाचे तसेच त्यासाठी आत्मिक साधना , विवेक पूर्णता आणि आध्यात्मिक विचाराची जाणीव असणे तितकेच महत्त्वाचे आहे. थोडक्यात, भौतिक सुविधा (Physical Facilities) आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, परंतु मानसिक समाधान हे विचार आणि अंतर्गत समतोलावर अवलंबून असते. धन, वैभव भौतिक सुविधा देते. सुविधा आणि सुख यामध्ये मोठा फरक आहे. सुविधा, सोय, पूर्तता या बाह्य व्यवस्था आहेत. सुख आणि शांती अंतरीक अवस्था आहेत. कोणी सर्व व्यवस्था असून बेचैन असू शकतो तर कोणी अत्यंतिक उणिवा असूनही सुखी असतो. आहे त्या परिस्थितीत सुख आणि शांतीत राहण्याची मानसिक तयारी, सवय असावी. प्रश्न वैभवाचा नाही तर आंतरिक चेतनेचा आहे. मनाची गुलामी सोडावी. वर्तमानात चेतना जागृत असावी. उद्या वैभव, प्रेम मिळेल त्या वेळी जगू हा विचार निरर्थक आहे. वर्तमान क्षण शाश्वत सत्य आहे, केवळ तो क्षण भूतकाळातील स्मृती आणि भविष्याच्या कल्पना सोडून जगावा. अर्थात चेतना जागृत असणे. तेंव्हाच आपण आपले मालक असतो. सुख शांतित असतो. म्हणूनच वर्तमानातील क्षण हा भौतिकते च्या अधिक आहारी न जाता, विवेक पूर्णतेत, संतोष वृत्तीने जगण्याचा प्रयत्न करत असतानाच वास्तविक आत्मिक समाधान आणि सुख लाभेल. शरीर आहे आणि आयुष्य आहे म्हणून जगणे क्रमप्राप्त ठरते, परंतु या जगण्यासाठी भौतिकतेचा किती प्रमाणात अवलंब करायचा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. विवेक पूर्ण अध्यात्मिक चेतना जागृत असेल तर त्याचा परिणाम जीवनशैलीवर नक्कीच असणार यात शंका नाही. त्यातूनच वास्तविक समाधान शांती लाभेल. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




