राम मंदिरातील देणगीच्या चोरीबाबत सुरू असलेला वादभावुकतेपासून ते राजकारणाच्या परिघापर्यंत पसरलेलाआहे. कुणाला भावना दुखावण्याची चिंता आहे, तरकुणासमोर असा प्रश्न आहे की याचा यूपीच्यानिवडणुकांवर काय परिणाम होईल. परंतु, जी एक मूलभूतचिंता या संपूर्ण प्रकरणातून समोर यायला हवी होती, ती हीकी, या देणगीच्या चोरीने आठवण करून दिली आहे की,आपण मुळात भ्रष्टाचार किंवा इतर अनेक वाईट गोष्टीमुकाट्याने सहन करणाऱ्या आणि बऱ्याचदा त्यात सामीलराहणाऱ्या समाजात बदललो आहोत. देणगीची चोरी करणाऱ्या लोकांना जर देवाचे नाही, तर किमान भक्तांचेतरी भय वाटले असते- की हे जर उघडकीस आले तर आपला सामाजिक बहिष्कार सुरू होईल. परंतु, अशी कोणतीही भीती त्यांच्या मनात नव्हती. त्यांच्यापैकी काहीजण पकडले गेले असून तुरुंगाच्या गजाआड आहेत,तरीही हा संशय कायम आहे की अनेक देणगीचोर बाहेरच मोकळे आहेत आणि ते पकडल्या गेलेल्या लोकांनाकठोरात कठोर शिक्षा देण्याची भाषा करत आहेत. आमचा समाज हळूहळू कोणत्याही गोष्टीची जाणीवठेवण्याची शक्ती गमावत चालला आहे. मंदिरात चोरीअसो, जातीय हिंसाचार असो, बलात्कार असो कीभ्रष्टाचार असो- आपल्याला आता कशाचेच काहीवाटेनासे झाले आहे. तसे तर आपण सर्वांनाच विरोधकरतो, सर्वांच्या विरोधात संताप व्यक्त करतो, पण हेकेवळ एक प्रदर्शन, एक देखावा असतो की आपण गप्पनाही आहोत हे इतरांनी पाहावे. आपण फक्त गोंगाट ऐकतोआणि करतो, ज्या प्रकरणांचा आपल्यावर थेट आघातहोतो, त्यावरही संताप व्यक्त करण्यापलीकडे आपणकाहीच करत नाही- मग ते पेपरफुटीचे प्रकरण असोकिंवा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत सुरू असलेलीचर्चा असो. इथून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. या ढोंगीपणाच्यामागे आपले संस्कारही आहेत का? जगभरातील धर्मांचीही समस्या राहिली आहे की, त्यामध्ये ईश्वर आणि भक्तयांच्यामध्ये दलाल बसलेले असतात, जे असा विश्वासदेतात की वरचा खूप दयाळू आहे आणि तो सर्वांची पापेधुवत राहतो. इंग्लंडमध्ये एका काळात पाप-मुक्तीचीप्रमाणपत्रे विकली जात असत. चौदाव्या-पंधराव्याशतकात चर्चमधील अंगभूत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जॉनविकलिफ यांच्यापासून ते मार्टिन ल्यूथर यांच्यापर्यंतच्यासंघर्षाने प्रोटेस्टंट चर्चचा पाया घातला. हिंदू धर्मातहीपाप-निवारणाचे अनेक उपाय आणि कर्मकांड प्रचलितआहेत. इस्लाममध्येही मौलवींच्या अजब-गजब फतव्यांनीखऱ्या मुसलमानांचे जगणे कठीण करून ठेवले आहे.अशा धार्मिक पाखंड आणि वर्चस्वाशी जेव्हा राजकारणजोडले जाते, तेव्हा यामध्ये खरा धार्मिक माणूसच सर्वातजास्त एकटा पडतो. आता बाजारपेठ ही अशी नियामक शक्ती आहे, जिलाठाऊक आहे की कधी राजकारणाचा वापर करायचा,कधी धर्माचा आणि कधी खेळाचा. देणगीची चोरीहादेखील या बाजारपेठेसाठी एक विक्रीयोग्य विषयचआहे, ज्यामध्ये एका बाजूला राजकीय समीकरणे आहेत,तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक आस्थेचा हवाला आहे. यालढ्यात विजय त्याचा होणार नाही, जो असा विश्वासदेईल की तो देणगीची चोरी पूर्णपणे थांबवेल किंवामंदिराची पवित्रता टिकवून ठेवेल, तर विजय त्याचा होईल,ज्याच्या असण्याने एका मोठ्या वर्गाला आपल्या हिताच्यारक्षणाचे आश्वासन मिळेल. स्वार्थी वृत्ती कदाचितआजकाल आमचा स्वभाव बनली आहे आणि जगातकाय चालले आहे व कसे चालले आहे, याने आम्हालाफारसा फरक पडत नाही. दुर्दैवाने जेव्हा त्याचा फटकाआपल्याला स्वतःला बसतो, तेव्हा आपल्याला समजते कीआपली अलिप्तता किंवा तटस्थता हीच आपली खरी शत्रूआहे . (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आपण भ्रष्टाचार किंवा इतर वाईट गोष्टीमुकाट्याने सहन करणाऱ्या समाजातबदललो आहोत. देणगी चोरी करणाऱ्यांनाजर देवाचे नाही,तर किमान भक्तांचे तरीभय वाटलेअसते- की हे जर उघडकीसआले तर सामाजिक बहिष्कार सुरू होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



