
Pimpri : पोलीस आयुक्तालयात वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या श्वान पथकाला अधिकची कुमक मिळणार आहे. अमली पदार्थ, गुन्हे शोधा करिता नऊ पदे भरण्यास राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली. याबाबतचे आदेश उपसचिव राजेंद्र भालवणे यांनी प्रसृत केले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात श्वान पथक आणि बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) स्थापन करण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. त्यासाठी पोलीस आयुक्तांकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी पुणे शहर पोलीस दलातील दोन श्वान पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांना देण्याबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) दिले. त्यानुसार सीआयडीने सिम्बा आणि जेम्स या दोघांना पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे पाठवले.
|
Pune : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा सूत्रधार अटकेत |
आता अमली पदार्थ शोध पथकाकरिता दोन पोलीस हवालदार, दोन पोलीस शिपाई आणि गुन्हे शोध पथकाकरिता एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस हवालदार आणि दोन पोलीस शिपाई अशी नऊ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर बाह्ययंत्रणेद्वारे सफाई कामगार हे एक पद भरले जाणार आहे. या माध्यमातून श्वान पथकाला बळ मिळणार आहे.
शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या सिम्बाचे वय आठ वर्ष आहे. त्याचे प्रशिक्षण राजस्थान येथे झाले आहे. तर, जेम्सचे वय पाच वर्ष असून त्याचे प्रशिक्षण हरियाणा येथे झाले आहे. श्वानांचा पोलीस दलात गुन्हे शोधक, अमली पदार्थ शोधक आणि बॉम्बशोधक या तीन प्रकारे वापर केला जातो. खून, दरोडा, घरफोडी, हरवलेली आणि अपहरण झालेली व्यक्ती शोधण्यासाठी श्वानांची मदत होते. कोकेन, गांजा, अफू आणि इतर अमली पदार्थ शोधण्यासाठी देखील श्वानांचा वापर होतो. गर्दीच्या ठिकाणी, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांमध्ये, जमिनीत पुरलेली स्फोटके शोधण्यासाठीही श्वान उपयोगी पडतात. सिम्बा हा गुन्हे शोधक म्हणून काम पाहत आहेत. तर जेम्स स्फोटके शोधण्याचे काम करत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




