पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जीवनात भक्ती उतरली की‎ प्रत्येक कर्मात सेवाच घडेल‎

सेवकाला स्वप्नातही सुख मिळत नाही, असे म्हटले जाते. मात्र, लक्ष्मण‎ आणि हनुमान यांसारख्या आदर्श सेवकांनी ही समजूत बदलून‎दाखवली. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये म्हटले आहे –‎"कहइ भसुंड सुनहु खगनायक, राम चरित सेवक सुखदायक।’ म्हणजेच‎श्रीरामांचे चरित्र सेवकाला सुख देणारे असते. त्यामुळे सेवकाला खरे‎सुख मिळते ते श्रीरामांशी अर्थात ईश्वराशी जोडले गेल्यावर. सेवा‎अनेकदा दिखाव्यासाठी, अहंकार वाढवण्यासाठीही केली जाते. परंतु‎जीवनात भक्तीचा भाव जागृत झाला की प्रत्येक कृती ही सेवाच बनते.‎आजच्या व्यावसायिक जगात ‘गिग वर्कर’ ही संकल्पना प्रचलित आहे.‎स्वतःच्या अटींवर, स्वतःच्या वेळेनुसार काम करणाऱ्या व्यक्तीला गिग‎वर्कर म्हटले जाते. ही सेवेची एक वेगळी व्याख्या ठरू शकते. तसेच‎एखादी व्यक्ती स्वतःला परमेश्वराशी जोडते. तेव्हा ती त्याच्या इच्छेला‎समर्पित होते. वेळ, प्रयत्न, परिणाम सर्व काही ईश्वराचे आहे. अशी‎त्याची भावना असते. आपण केवळ निमित्त आहोत; खरा कर्ता ईश्वरच‎आहे.

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *