पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपला अपमान होईल‎ तेव्हा विचलित होऊ नका‎

भक्तांचे हित साधण्याची देवाकडे स्वतःची एक वेगळी पद्धत आहे.‎ समजा एखाद्या लहान मुलाच्या शरीरावर फोड आला, तर आई त्याचे‎ उपचार करते. उपचारादरम्यान त्याला थोडी वेदना होते. पण आईला‎ माहीत असते की, भविष्यात हा फोड त्रास देणार नाही. तसेच देव‎भक्तांच्या परिस्थितीमध्ये वेळोवेळी बदल करतो. त्यापैकी एक म्हणजे‎‘अहंकार’ काढून टाकणे. आपण कोणत्याही प्रवासाला निघालो, तर ‎सामानाचे वजन कमी असेल, तितका तो प्रवास सुखकर होतो.‎ जीवनाच्या प्रवासाचे तीन टप्पे आहेत - पहिला टप्पा म्हणजे जन्म‎(बसणे), दुसरा संसार (चालणे) ,तिसरा मृत्यू (उतरणे). प्रवासात‎ अहंकाराचे ओझे जास्त असल्यास अडखळायला होणारच.‎ तुलसीदासजींनी लिहिले - ‘तिमि रघुपति निज दास कर हरहिं मान‎हित लागि।’ अर्थात भगवान श्रीराम भक्ताच्या हितासाठीच अहंकार‎ काढून घेतात. म्हणूनच अपमान होईल. तेव्हा विचलित होऊ नका.‎ उलट, हा अपमान आपल्याला अहंकारमुक्त करण्यासाठीच घडला‎ आहे, असा विचार करा.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *