Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक जण हिरो होण्याचं स्वप्न घेऊन येतात. मात्र प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. काही जण वर्षानुवर्षे संघर्ष करतात तर काही जण लवकरच वेगळा मार्ग निवडतात. अशाच एका अभिनेत्याचं नाव चर्चेत आलं आहे. तो अभिनेता म्हणजे गिरीश कुमार.
गिरीश कुमारने 2013 साली ‘रमैया वस्तावैया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रुति हासन आणि सोनू सूद प्रमुख भूमिकेत होते. मोठ्या बॅनरची साथ असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही.
यानंतर गिरीशने पुन्हा एकदा नशीब आजमावत लवशुदा हा चित्रपट केला; मात्र हा चित्रपटही फ्लॉप ठरला. सलग दोन अपयशांनंतर गिरीशने अभिनय क्षेत्राला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाची जबाबदारी
गिरीश कुमार हा प्रसिद्ध निर्माता रमेश तौरानी यांचा मुलगा आहे. रमेश तौरानी हे टिप्स इंडस्ट्रीज या मोठ्या मनोरंजन कंपनीचे मालक आहेत. अभिनय सोडल्यानंतर गिरीशने वडील आणि काकांसोबत कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला.
आज गिरीश कंपनीमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) या पदावर कार्यरत आहे. चित्रपट निर्मिती, वितरण आणि संगीत क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय तो घेतो. त्याच्या नेतृत्वाखाली कंपनीने अनेक मोठ्या स्टार्सचे चित्रपट आणि संगीत प्रकल्प हाताळले जातात. काही अहवालांनुसार, गिरीश सध्या सुमारे 8533 कोटी रुपयांच्या व्यवसायाशी निगडित आहेत.
वैयक्तिक आयुष्यही चर्चेत
गिरीश कुमारचा लूकही आता पूर्णपणे बदलला आहे. विविध कार्यक्रमांमध्ये तो क्वचितच दिसतो आणि त्याचा बदललेला अंदाज पाहून चाहते आश्चर्यचकित होतात. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलताना गिरीशने एका मुलाखतीत सांगितले की त्याने बालमैत्रीण कृष्णासोबत 2007 पासून डेटिंग सुरू केले होते. ते दोघे किशोरवयीन असताना त्यांना नातं गंभीर असल्याची जाणीव झाली. मात्र, नवीन अभिनेता असल्याने आणि चित्रपटांच्या यशावर वैयक्तिक आयुष्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी लग्नाची गोष्ट वर्षभर गुप्त ठेवली होती.
अभिनय क्षेत्रात अपेक्षित यश न मिळालं तरी गिरीश कुमारने कौटुंबिक व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन फ्लॉप चित्रपटांनंतरही त्याने निराश न होता व्यवसायात मोठं स्थान मिळवलं आणि हेच त्याच्या यशाचं खऱ्या अर्थाने उदाहरण ठरलं आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




