
Manoj Jarange Mumbai Visit : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आजपासून दोन दिवसीय मुंबईदौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे मुंबईत, विविध मराठा संघटना मराठा समाजबांधवांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मुंबईत दाखल झाल्या झाल्या मनोज जरांगे सिद्धीविनायक चरणी नतमस्तक झाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मोठं आंदोलन केलं होतं. जरांगेंची समजूत काढण्यासाठी अख्खं सरकार जालना आंतरवालीत दाखल झालं होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आश्वासनानंतर जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं. तेव्हापासूनच मनोज जरांगे राज्यभरात दौरा करत आहेत.
मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेताना मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावं यासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. उपोषण मागे घेतल्यापासूनच मनोज जरांगे मराठवाड्यासह राज्यभरात दौरा करत आहेत. तसेच, मुंबईनंतर मनोज ,जरांगे पुणे सातारा कोल्हापूर, अहमदनगर आणि बीडचा दौरा करणार असून या भागांतील मराठा संघटना आणि मराठा समाजातील बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच, जरांगे पाटील 20 ऑक्टोबरला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेणार आहेत.
|
|
'त्या' जखमी समाज बांधवाला भेटण्यासाठी मनोज जरांगे रुग्णालयात
मराठा नेते मनोज जरांगे यांची 9 ऑक्टोबर रोजी येवला शहरात सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे यांच्या स्वागत मिरवणुकीत जेसीबीतून फुलांची उधळण करत असताना लोडर पलटी होऊन झालेल्या अपघातात चारजण जखमी झाले होते. त्यापैकी गोकुळ रावसाहेब कदम यांच्या डोक्याला मार लागल्यानं त्यांच्यावर शिर्डी जवळील कोपरगाव येथील एसजेएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री जरांगे मुंबईकडे येत असताना त्यांनी गोकुळ कदम आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. मनोज जरांगे रुग्णालयाच्या बाहेर पडताच तरुणांनी त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. माणुसकीच्या नात्यानं जर या समाज बांधवाला मदत करण्यात येत असेल तर ठीक आहे. मात्र, राजकारण म्हणून जर कोणी मदत करत असेल, तर मदत न केलेली बरी. समाज बांधव मदतीसाठी सक्षम असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
- मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा
- कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी
- मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी
- दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या
- PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावं
14 ऑक्टोबरला पार पडलीय मनोज जरांगेंची जाहीर सभा
जालन्यातील आंतरवाली सराटीत 14 ऑक्टोबरला मनोज जरांगेंची जाहीर सभा पार पडली. जरांगे पाटलांच्या सभेसाठी 150 एकरचं मैदान ठरवण्यात आलं होतं. आदल्या दिवशी रात्रीपासूनच मराठा आंदोलकांची गर्दी आंतरवाली सराटीत झाल्याचं पाहायला मिळत होतं. जाहीर सभेतील भाषणात जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटची आठवण करुन दिली. सरकारला आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती, या कालावधीतच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, जर सरकारनं दिलं नाही दिलं, तर मग चाळीसाव्या दिवशीच सांगू, असा इशाराही भाषणात बोलताना जरांगे पाटलांनी दिला होता.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



