जेव्हा आयुष्य थांबल्यासारखे वाटते, चिंता वाढू लागते आणि तुम्ही स्वतःला चार भिंतीत अडकल्यासारखे अनुभवता, तेव्हा तुम्ही काय करता? मी ही परिस्थिती अनेकदा विद्यापीठातील नवीन विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाहतो, ज्यांना रविवारी नवीन शहरात नक्की काय करावे हेच समजत नाही. सर्वात आधी त्यांना असे वाटते की येथून पळून जावे. ते विचार न करता तासन््तास व्हिडिओ स्क्रोल करत राहतात, डोळे दुखेपर्यंत बिंजवॉच करतात किंवा व्हिडिओ गेम्समध्ये हरवून जातात. यामुळे त्यांना काही काळ दिलासा तर मिळतो, पण शेवटी त्यांना एकटेपणा आणि पोकळी जाणवते. थोडक्यात सांगायचे, तर ते मनोरंजनाचा उपभोग तर घेतात, पण ते निर्माण करण्याचा क्वचितच विचार करतात, पण कंटाळा दूर करण्याचा तुमचा एखादा साधा मार्ग, एखादे लेट-नाइट स्ट्रेस-रिलीफ डूडल किंवा पाळीव कुत्र्याशी संबंधित एखादी मस्करीच कोट्यवधी रुपयांच्या जागतिक स्टार्टअपचे बीज बनले तर? लखनऊच्या बहिणी मृणालिनी मित्रा (27) आणि न्योनिका (26) यांची ही असामान्य कथा आज वसतिगृहाच्या खोलीत बसलेल्या कोणत्याही तरुणासाठी एक उत्तम शिकवण आहे. हे सिद्ध करते की, जेव्हा तुम्ही मनोरंजनाकडे नावीन्यपूर्ण दृष्टिकोनातून पाहता, तेव्हा लिव्हिंग रूममध्ये केलेले साधे कामही जागतिक व्यवसायात बदलू शकते. काही वर्षांपूर्वी मृणालिनी आणि न्योनिका तिथेच उभ्या होत्या, जिथे पोहोचण्याचे स्वप्न भारतातील अनेक महत्त्वाकांक्षी तरुण पाहतात. मृणालिनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर होती आणि न्योनिकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली होती. परदेशातील प्रतिष्ठित कॉर्पोरेट इंटर्नशिप आणि शानदार जागतिक करिअर त्यांची वाट पाहत होते. तेव्हाच त्यांना समजले की त्यांच्या आईला कर्करोग झाला आहे, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. एका क्षणाचाही विचार न करता दोन्ही बहिणींनी आपले सर्व प्लॅन सोडून आईची काळजी घेण्यासाठी लखनऊमधील राजेंद्रनगर येथील आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. घरातील वातावरण जड झाले होते आणि दोघींवरही खूप भावनिक दडपण होते. यातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाने एक नियम बनवला की, दर रविवारी बोर्ड गेम्स खेळले जातील. या कठीण काळात मनाला थोडा आनंद देण्याचा हा एक मार्ग होता. जसे व्हॅनिला आइस्क्रीममध्ये चॉकलेट मिसळले जाते, तसेच जेव्हा या दोन्ही बहिणींनी मनोरंजनात नावीन्यतेची जोड दिली, तेव्हा त्यांची साधी कौटुंबिक कहाणी उद्योजकतेचे एक उत्तम उदाहरण बनली. बहुतांश लोक बाजारातून एखादा साधासा बोर्ड गेम विकत घेतात, पण मित्रा बहिणींनी मनोरंजनासोबत काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि आपली एक वेगळी दुनिया बनवण्याचे ठरवले. कठीण परिस्थितीत घरात आनंदाचे क्षण आणणारा आपला पाळीव कुत्रा ‘यासु’ याच्यापासून प्रेरित होऊन बहिणींनी काही पात्रांचे स्केचिंग सुरू केले. रिकाम्या कार्ड््सवर पौराणिक कथा, हाताने काढलेली चित्रे, मूळ संगीत आणि वैयक्तिक किस्से गुंफले. सुरुवातीला हे केवळ ताण दूर करण्याच्या थेरपीसारखे होते, जेणेकरून त्या एकमेकींना हसवू शकतील आणि दैनंदिन जीवनात आनंदाशी जोडलेल्या राहतील. त्यांनी कोणताही बिझनेस प्लॅन बनवला नव्हता. फक्त थोडी मजा करण्याचा एक चांगला मार्ग शोधून काढला होता, पण जेव्हा त्यांनी हाताने बनवलेली ही पात्रे यूट्यूबवर शेअर केली, तेव्हा ती इंटरनेटवर पाहिली जाऊ लागली. लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अनोळखी लोकही विचारू लागले की हा गेम कुठून विकत घेता येईल. याच क्षणी बहिणींना जाणीव झाली की त्यांच्या या वैयक्तिक स्ट्रेस-बस्टरमध्ये व्यवसायाचीही शक्यता आहे. अशा वेळी जेव्हा टेक स्टार्टअप्स खर्च वाचवण्यासाठी एआय-जनरेटेड आर्टवर्क वापरत आहेत, तेव्हा या बहिणींनी एक धाडसी आणि अपेक्षांच्या विरुद्ध मार्ग निवडला- प्रत्येक चित्र त्यांनी स्वतःच्या हातांनी काढले. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या या ‘लिव्हिंग रूम स्ट्रेस-बस्टर’ने एक लाख डॉलर (सुमारे 95.45 लाख रुपये) पेक्षा जास्त महसूल मिळवला. 40 देशांमध्ये या गेमचे खरेदीदार आहेत. फंडा हा आहे की, जेव्हा तुम्ही तुमच्या मजेला नावीन्यपूर्ण बनवता, विचारांना कागदावर उतरवता आणि त्यांना ऑनलाइन शेअर करता, तसेच तुमची कल्पना केवळ वेळ घालवण्याचे साधन नसून एक संभाव्य संपत्ती आहे हे मानता, तेव्हा एखादा साधासा खेळही जागतिक व्यवसायाचे बीज बनू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- पुणे: मावळात मोठा अनर्थ टळला; काळे येथे रस्ता खचल्याने कार थेट शेतात उलटली, धोकादायक रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
- छत्रपती संभाजीनगर: फोन पे वर ५ हजारांची लाच घेतली अन् बेड्या पडल्या; मटण दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेणारा कंत्राटी डाटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
- बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड
महाराष्ट्र
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- पुणे: मावळात मोठा अनर्थ टळला; काळे येथे रस्ता खचल्याने कार थेट शेतात उलटली, धोकादायक रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
- छत्रपती संभाजीनगर: फोन पे वर ५ हजारांची लाच घेतली अन् बेड्या पडल्या; मटण दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेणारा कंत्राटी डाटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
- बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड
गुन्हा
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

🚩 श्री महाकालेश्वर मंदिरात पार पडली दिव्य भस्म आरती #PuneNews #Mahakal #Ujjain #BhasmaAarti #HarHar
"शिक्षणासाठी आलो, गुन्हेगार नाही!" #JantarMantar #StudentProtest #Delhi #Education #BreakingNews
🚨 दिल्लीत आंदोलनादरम्यान हिंसाचार; पोलिसांच्या PCR व्हॅनची तोडफोड #Delhi #Protest #JanpathMetro
देश विदेश
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात























Subscribe to my channel




