13 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतन्याहू आणि व्लादिमिर पुतीन यांची व्यक्तिमत्त्वे वेगवेगळी असली तरी त्यांच्यात एक समान धागा आहे. कोणत्याही बैठकीत सर्वांत बुद्धिमान व्यक्ती आपणच आहोत, असा त्यांचा समज आहे. तिघांनीही आपल्या आजूबाजूला स्तुतिपाठकांची मंडळी जमा केली. परिणामी ते एका संघर्षांत अडकले आहेत. यातून बाहेर पडण्याचा स्पष्ट मार्ग दिसत नाही. सर्वात आधी नेतन्याहूंचा विचार करू. त्यांनी वास्तवापासून दूर जाण्याचे, तसेच मोसादच्या नेतृत्वालाही त्याच दिशेने नेल्याचे संकेत त्यांच्या दोन निर्णयांत दिसून येतात. पहिले म्हणजे, केवळ हवाई हल्ल्यांच्या जोरावर इस्रायल तेहरानमधील सत्ताबदल घडवू शकतो, हा समज. दुसरा म्हणजे इराणचा पुढील नेता आपण ठरवू शकतो हा विश्वास. 1982 मध्ये लेबनॉनमध्ये ख्रिश्चन मिलिशियाने मोसादला असा विश्वास दिला होता की, मर्यादित लष्करी कारवाईद्वारे बैरूटमध्ये पॅलेस्टिनीविरोधी नेते बशीर गेमायेल यांना राष्ट्रपती बनवता येईल. त्या काळापासून माझे मत असे आहे की, बैरूट किंवा तेहरानमध्ये एखाद्याची हत्या करायची असेल तर मोसादला बोलवा; पण तेथील राजकीय व सामाजिक प्रवाह समजून घ्यायचे असतील, तर त्यांच्यावर अवलंबून राहू नका. या कारणामुळे ते पहिल्या कामात निष्णात आहेत. त्याच कारणामुळे ते दुसऱ्या कामात कमी पडतात. मोसाद इस्रायलच्या शत्रूंचा शोध घेऊन त्यांचा नायनाट करण्यात अत्यंत सक्षम आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लेबनॉन, इराण, वेस्ट बँक व अरब जगतातील इतर भागांतील असंतुष्ट नागरिकांना माहितीदार म्हणून जोडण्यात त्यांचे कौशल्य. पण हेच लोक अनेकदा सरकारच्या कमकुवतपणाचे अतिशयोक्त चित्र रंगवतात व सत्ता उलथवणे शक्य असल्याचा आभास निर्माण करतात. ट्रम्पसारखे इतिहासाची सखोल जाण नसलेले नेते असा समज करून घेतात की, मोसाद हत्या करण्यात सक्षम असेल, तर त्या हत्यांनंतर पुढे काय घडेल, याचाही अचूक अंदाज तो बांधू शकतो. याच कारणामुळे फेब्रुवारीमध्ये व्हाइट हाऊसमधील बैठकीत नेतन्याहू आणि मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी इस्रायल आणि अमेरिका मिळून इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाचा अंत केला तर तेथील सरकार कोसळेल आणि चांगले लोक सत्तेवर येतील, असे सांगितल्यावर ट्रम्प यांनी ते गांभीर्याने स्वीकारले. त्यांनी इराणही व्हेनेझुएलाप्रमाणे सहज आपल्या प्रभावाखाली येईल, असे गृहीत धरले. ट्रम्प आणि नेतन्याहूच अशा भ्रमाचे बळी ठरलेले नाहीत. पुतीन यांनीही स्वतःच निर्माण केलेल्या या समजुतीवर विश्वास ठेवला की, युक्रेनमधील जनता पुन्हा ‘मदर रशिया’ चा भाग होण्यास उत्सुक आहे आणि कीव्हमधील सरकार सहज कोसळेल. त्यांची सर्वांत मोठी चूक म्हणजे युक्रेनियन व रशियन हे एकच लोक आहेत तसेच युक्रेनचे स्वातंत्र्य ही केवळ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेली कृत्रिम संकल्पना आहे, असे मानणे. इराणप्रमाणेच रशियन गुप्तचर यंत्रणाही अशा रशियासमर्थक स्रोतांवर अवलंबून राहिली. त्यांनी वास्तव मांडण्याऐवजी मॉस्कोला ऐकायचे तेच सांगितले. नेतन्याहू यांनी हमास, हिझबुल्ला आणि तेहरानविरोधात सामरिक पातळीवर काही यश मिळवले असले तरी त्याचे इस्रायलसाठी दीर्घकालीन धोरणात्मक लाभात रूपांतर करता आलेले नाही. ट्रम्प यांनी कोणत्याही मित्रदेशाच्या पाठिंब्याशिवाय, आंतरराष्ट्रीय वैधतेशिवाय आणि पर्यायी आराखड्याशिवाय इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेत अमेरिकेला अधिक कमकुवत आणि एकाकी केले. त्याचबरोबर त्यांनी इराणला कमी खर्चात मोठा अडथळा निर्माण करण्याचे दोन प्रभावी मार्गही दाखवून दिले— पहिला होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण व दुसरा, आखाती भागातील अमेरिकेच्या मित्रदेशांना लक्ष्य करणे. दुसरीकडे पुतिन यांनी रशियाच्या कमकुवत लोकशाहीचे रूपांतर पोलीस राज्यात केले असून देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियमवर अवलंबून राहिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्रांतीत आज रशिया कुठेही ठळकपणे दिसत नाही. हे तिन्ही नेते अशा एका बंद मार्गावर येऊन पोहोचले आहेत. तेथून बाहेर पडण्यासाठी ते पुन्हा पुन्हा लष्करी कारवाईचाच आधार घेत आहेत. (द न्यूयॉर्क टाइम्स)

ट्रम्प, नेतन्याहू आणि पुतीन या तिघांनाही कोणत्याही बैठकीत सर्वात बुद्धिमान व्यक्ती आपणच आहोत, असा भ्रम आहे. तिघांनीही आपल्या भोवती स्तुतिपाठकांची फौज उभी केली आहे. त्यामुळे ते बाहेर पडण्याचा मार्ग स्पष्ट दिसत नसलेल्या युद्धांत अडकले आहेत.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




