57 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

अनेक दशकांपासून एकच स्थिती पाहायला मिळायची. भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष व्हायचा. त्यानंतर तणाव निवळायचा आणि औपचारिक शांतता चर्चा सुरू व्हायची. मात्र, सरतेशेवटी या प्रक्रियेचे रूपांतर पुन्हा संघर्षातच व्हायचे. आता ही साखळी तुटली आहे. 2016 पासून दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा झालेली नाही. ही केवळ कूटनीतिक नाराजीची तात्पुरती लाट नाही. तर, हा भारताच्या परराष्ट्र धोरणातील एका मूलभूत बदलाचा संकेत आहे. या बदलाने उपखंडातील सुरक्षा व्यवस्था कायमस्वरूपी बदलून टाकली आहे.
या कोंडीची मुळे भूतकाळातील कूटनीतिक अपयशांमध्ये शोधता येतील. पाकिस्तानने 1947, 1965 आणि 1971 मध्ये पारंपरिक युद्धे पुकारली. पण, कोणत्याही युद्धात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तिसऱ्या युद्धाचा परिणाम म्हणून पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशचा जन्म झाला. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात अफगाणिस्तानात सोव्हिएत सैन्याविरुद्ध अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या मुजाहिदीनला यश मिळाले. यातून प्रेरणा घेत पाकिस्तानने एक नवी रणनीती अवलंबली. जी दहशतवादावर आधारित होती. 1989 ते 1993 दरम्यान दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतातील सर्वसामान्य नागरिक मारले जात होते. त्या वेळी ‘भारताला हजारो जखमा देऊन नष्ट करू’ असे म्हणत पाकिस्तानी लष्करी अधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेत होते.
असे असूनही, सुनियोजित चर्चेच्या माध्यमातून पाकिस्तानला ही रणनीती सोडण्यास राजी करता येईल, असा भारतीय नेत्यांचा विश्वास होता. मात्र, भारताने शांततेच्या दिशेने टाकलेल्या प्रत्येक मोठ्या पावलाला लष्करी चिथावणी किंवा दहशतवादी कारवाईनेच उत्तर दिले गेले. पाकिस्तानी सरकार या घटना रोखण्यात एक तर असमर्थ होते किंवा त्यांची तशी इच्छाच नव्हती. 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी ऐतिहासिक बस यात्रा करून लाहोरला पोहोचले. तिथे त्यांनी महत्त्वाच्या शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पण, नेमके त्याचवेळी पाक सैन्य कारगिलमध्ये घुसखोरी करत होते. 2008 मध्ये पडद्यामागे सुरू असलेली कूटनीतिक चर्चा काश्मीर प्रश्नाच्या बिगर-प्रादेशिक तोडग्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर होती. त्याच वेळी 26/11 चा हल्ला झाला.
यातून पाकिस्तानच्या संस्थात्मक व्यवस्थेतील एक मोठी दरी उघड झाली. चर्चेच्या टेबलावर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नागरी सरकारांकडे पुरेसे अधिकार नव्हते. तसेच, ती आश्वासने पाळण्यासाठी ते दीर्घकाळ सत्तेवरही टिकू शकत नव्हते. दुसरीकडे, पाकिस्तानची लष्करी आणि गुप्तचर यंत्रणा भारतासोबतच्या शांततेला स्वतःच्या वर्चस्वासाठी धोका मानत होती.
पण आता भारताच्या संयमाचा बांध फुटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला शांतता प्रस्थापित करण्याच्या जुन्या कूटनीतिक परंपरेचेच पालन केले. त्यांनी 2014 मधील आपल्या शपथविधी सोहळ्याला नवाज शरीफ यांना आमंत्रित केले. त्यानंतर पुढच्याच वर्षी ते स्वतः लाहोरला गेले. पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला होऊनही, मोदींनी शरीफ यांना या घटनेच्या अधिकृत तपासात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.
मात्र, त्यानंतर अशी घटना घडली जिने भारताच्या संयमाचा अंत पाहिला. पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने असा निष्कर्ष काढला की, ‘हा हल्ला पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी भारतानेच रचलेला एक बनाव होता.’ यानंतर भारताने धोरणात्मक संयमाचे आपले धोरण सोडून दिले आणि एका नव्या तत्त्वाला आपला मार्गदर्शक बनवले. ते म्हणजे: ‘चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी चालू शकत नाहीत.’ जोपर्यंत पाकिस्तान राजाश्रय मिळालेल्या दहशतवादी नेटवर्कला उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत भारत चर्चेच्या टेबलावर परतणार नाही.
या कूटनीतिक बदलासोबतच भारताच्या लष्करी तत्त्वातही एक मूलभूत बदल झाला. आपला अण्वस्त्रांचा साठा भारताला दहशतवादी हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात पारंपरिक लष्करी कारवाई करण्यापासून रोखेल, असे पाकिस्तानला जवळपास तीन दशकांपासून वाटत होते. मात्र, विशेषतः गेल्या वर्षी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारताने पाकिस्तानचा हा भ्रमही मोडीत काढला आहे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट)

जोपर्यंत पाकिस्तानमध्ये राजकीय बदल होऊन त्यांची विचारसरणी आणि प्राधान्यक्रम मुळापासून बदलत नाही, तोपर्यंत भारत-पाकिस्तानमधील चर्चेच्या टेबलावर शांतताच राहील. आता हेच ‘न्यू नॉर्मल’ आहे.

This post was originally published on this site.
शहर
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
- पुणे: राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही! स्वच्छता कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या राजकीय दबावावर पुणे महापालिका आयुक्तांचा कडक इशारा!
- मुंबई: पर्यावरणाला धक्का! पुनर्विकास प्रकल्प आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल १८२ झाडे तोडण्यास मंजुरी!
महाराष्ट्र
- चंद्रपूर: तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी देणाऱ्या आमदार बच्चू कडूंसह ६ जणांवर गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण
- सिंधुदुर्ग: बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून उद्धव ठाकरे पूर्णपणे दूर गेलेत कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंवर घणाघात
- पुणे: लोहगावात ५५ कोटींची भव्य वास्तू उभी, पण उपचारासाठी रुग्णांच्या वाट्याला केवळ 'रेफर टू ससून'!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!




























Subscribe to my channel




