न्यायव्यवस्थेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास असतो. तो तिला जीवनातील मोठ्या प्रश्नांवर निर्णय देण्यास सक्षम बनवतो. त्यात संकोच नसतो.आत्मसंशय नसतो; उलट आपल्या समोरील याचिकानीट वाचून आणि युक्तिवाद काळजीपूर्वक ऐकूनघेतलेल्या व्यक्तीची ठाम भूमिका त्यात दिसते. त्यामुळेत्यांच्या निर्णयांत संदिग्धता किंवा अर्धवटपणाला जागाराहत नाही. भोजशाला प्रकरणच घ्या. न्यायालयासमोर प्रश्न होताकी भोजशाला परिसर — येथे कमाल मौला मशीद असल्याचे सांगितले जाते — त्याचे मूळ स्वरूप हिंदू मंदिराचे आहे का? तेथे शुक्रवारी नमाज आणिमंगळवार व वसंत पंचमीला सरस्वती पूजेची व्यवस्थासुरू ठेवावी का? न्यायालयाने त्या परिसराला मंदिरमानत हिंदूंना प्रवेशाची परवानगी दिली. मुस्लिमांनामशीद बांधण्यासाठी इतर योग्य जागेची मागणी करण्यासाठी अर्ज करण्याची मुभाही दिली. मात्र अशा प्रकारच्या निर्णयांना रोखण्यासाठीच 1991 मध्ये उपासनास्थळ (विशेष तरतूद) कायदा करण्यात आला होता. याकायद्यानुसार भारतातील प्रत्येक उपासना स्थळाचेधार्मिक स्वरूप 15 ऑगस्ट 1947 रोजी जसे होते, तसेचकायम मानण्यात आले. केवळ बाबरी मशीद वादाच्याविशेष स्वरूपामुळे त्याला अपवाद ठेवले होते. पणआता या कायद्यातील एक कमकुवत दुवा शोधला गेलाआहे. प्रत्यक्षात या कायद्यात प्राचीन आणि संरक्षितस्मारकांसाठी मर्यादित अपवाद ठेवण्यात आला होता.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने संरक्षित केलेल्या वारसास्मारकांच्या बाबतीत स्वातंत्र्यकाळातील धार्मिक स्थितीस्थिर मानण्याचा आणि नव्या दाव्यांवर बंदी घालण्याचानियम लागू होणार नाही, असे त्यात नमूद होते. यामागील तर्क समजण्यासारखा आहे. कारण भविष्यातआणखी पुरातत्त्वीय अवशेष सापडू शकतात. मात्र हामर्यादित अपवाद होता; शंभर वर्षांहून जुन्या प्रत्येकरचनेचे उत्खनन करून तपासणी करण्यासाठी खुलेनिमंत्रण नव्हते. आता उच्च न्यायालयाने हा अपवादचमूळ नियमापेक्षा मोठा मान्य केला आहे. त्यामुळेसर्वोच्च न्यायालयाने अपीलमध्ये वेगळी भूमिका घेतलीनाही, तर उपासना स्थळ कायदा जवळपास निष्प्रभठरेल. आता शंभर वर्षांपेक्षा जुने प्रत्येक स्मारकन्यायालयीन वादाची वाट पाहत उभे राहील. आणित्यातून काय सापडेल, हे आपल्याला ठाऊक आहे —मशिदींखाली मंदिरांचे अवशेष, त्यांच्या खालीबौद्धकालीन अवशेष आणि कदाचित त्याहूनही प्राचीनचिन्हे. पण संसदेला हा इतिहास माहीत नव्हता म्हणून हाकायदा करण्यात आलेला नव्हता. उलट प्रत्येकअवशेषावर पुन्हा खटले चालवणे, अशी प्रकरणेन्यायालयात खेचणे यामुळे देशाची प्रगती होणार नाही,याची संसदेला जाणीव होती. दुसऱ्या एका प्रकरणात गंगेत मांसाहारी अन्नफेकल्याप्रकरणी पाच मुस्लिमांना अटक करण्यातआली. न्यायाधीशांनी जामिनाला विरोध करणारेयुक्तिवाद फेटाळून लावत आरोपींनी खेद व्यक्तकेल्याचे आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी इतिहासनसल्याचे नमूद केले. त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्याचेकारण नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांनीअसेही निरीक्षण नोंदवले की गंगेत मांसाहारी अन्नफेकणे हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे मानलेजाऊ शकते. न्यायालय असेही म्हणू शकले असते कीकोणत्याही प्रकारचे उरलेले अन्न नदीत टाकणे चुकीचेआहे. हिंदूंना गंगेत मांस फेकल्याने आक्षेप असेल. पणप्लास्टिक, औद्योगिक कचरा आणि सांडपाणीसोडल्याने नाही, असे मानणे कठीण आहे. मात्रन्यायालये श्रद्धेशी संबंधित प्रश्नांत उतरतात. तेव्हाअनेकदा राजकीयदृष्ट्या प्रभावी बाजूवर अधिक भरदिला जातो. त्यामुळे वाद अधिकच वाढतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) उपासना स्थळ कायदा यासाठी बनवण्यात आलेला नव्हता की देशाच्यासंसदेला इतिहास माहीत नव्हता. उलटसंसदेला हे समजत होते की प्रत्येकजखम पुन्हा कुरवाळत राहिल्यास देशप्रगती करू शकणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी; तुकाराम मुंढेंचे नवे नियम कुणाला लागू होणार?
कोथरूडमध्ये भरधाव कारची दुचाकींना धडक! नागरिकांनी चालकाला पकडलं
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची फडणवीसांकडे मोठी मागणी; दिवाळीपूर्वी हेक्टरी ₹१ लाख मदत द्या!
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




