परकीय चलन मिळवण्याच्या आणि रोजगार निर्माणकरण्याच्या सर्वात वेगवान मार्गांपैकी एक पर्यटन हादेखील आहे, तरीही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.अशा वेळी, जेव्हा जागतिक अनिश्चितता, ऊर्जेच्याकिमतींमधील अस्थिरता, पुरवठा साखळीतील व्यत्ययआणि भू-राजकीय धक्के चालू खात्यावर दबाव आणतआहेत, तेव्हा पर्यटन आपल्या अर्थव्यवस्थेसाठीस्टॅबलायझरचे काम करू शकते. परदेशी पर्यटक थेट आपल्या अर्थव्यवस्थेत डॉलरघेऊन येतात. ते हॉस्पिटॅलिटी, वाहतूक, पर्यटन स्थळे,स्मृतिचिन्हे, सांस्कृतिक अनुभव आणि स्थानिकखाद्यपदार्थांवर पैसे खर्च करतात. यातील प्रत्येक क्षेत्रस्वतःच रोजगार निर्मितीचा एक शक्तिशाली स्रोत आहे.पर्यटनाशी जोडला गेलेला प्रत्येक प्रत्यक्ष रोजगार 13अप्रत्यक्ष रोजगारांनाही जन्म देतो. वेटर, शेफ, ड्रायव्हर,गाइड, कारागीर, होमस्टे संचालक, डिजिटल मार्केटरआणि हजारो छोटे स्थानिक उद्योग ही याची केवळ काहीउदाहरणे आहेत. जिथे मॅन्युफॅक्चरिंग-आधार ती थेटपरकीय गुंतवणूक- ज्याला दीर्घकालीन उपाय म्हणूनप्राधान्य दिले जाते- ती प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक वर्षेलागतात आणि लक्षणीय पातळीवर परकीय चलन निर्माणकरण्यासाठी त्याहूनही अधिक वेळ लागतो, तर दुसरीकडेपर्यटन हे एखाद्या पर्यटकाच्या निर्णयांचे काही महिन्यांतचडॉलरमध्ये रूपांतर करते. भारताच्या एव्हिएशन कंपन्यांनी 2000 हून अधिकनवीन विमानांची ऑर्डर दिली आहे, ज्यांचा पुरवठा येत्याकाही वर्षांत वेगाने वाढेल. वरवर पाहता ही एव्हिएशनक्षेत्राच्या महत्त्वाकांक्षेची कहाणी वाटते, परंतु जरत्याचवेळी ही विमाने परदेशी पर्यटकांनी भरण्याचे प्रयत्नकेले गेले नाहीत, तर त्याचे उलटे परिणामही मिळूशकतात: भारतीयांसाठी परदेश प्रवास अधिक सोपाआणि स्वस्त होईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मौल्यवान परकीय चलन देशाबाहेर जाईल. गेल्या 4 वर्षांत भारताच्या परदेशी पर्यटन मार्केटिंग बजेटमध्ये जवळपास शून्यापर्यंत कपात करण्यात आली आहे. त्याचे परिणामही अपेक्षित आहेत. 2024 या वर्षात भारतात 99 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक आले- जे महामारीच्या आधीच्या सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे 10%कमी आहेत. जिथे भारताचे सर्व प्रमुख प्रतिस्पर्धी देश2019 ची पातळी ओलांडून पुढे गेले आहेत, तिथे आपण आजही त्या स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतआहोत. त्यामुळे आपल्या परदेशी पर्यटन मार्केटिंगबजेटमध्ये केलेली मोठी कपात आश्चर्यकारक आहे. एक परदेशी पर्यटक आपल्या प्रत्येक दौऱ्यात भारताच्या जीडीपीमध्ये 3,000 डॉलरचे योगदान देतो, तर एकादेशांतर्गत पर्यटकाचे योगदान केवळ 75 डॉलर असते- म्हणजे यात 40 पटीचा फरक आहे. मार्केटिंगवर 20 कोटी डॉलरची गुंतवणूक 10 लाख अतिरिक्त परदेशी पर्यटकांना आकर्षित करेल, ज्यातून 3.6 अब्ज डॉलरचे आर्थिकमूल्य निर्माण होईल, 40 कोटी डॉलरची जीएसटी प्राप्तीहोईल आणि 2.83 लाख नवीन रोजगार निर्माण होतील. म्हणजेच मार्केटिंगवर खर्च केलेल्या प्रत्येक डॉलरवर 18 पटींनी परतावा मिळेल. केवळ 55,000 अतिरिक्तपर्यटक- जे भारताच्या सध्याच्या टूरिस्ट-बेसच्या फक्त0.5% आहेत- संपूर्ण मार्केटिंग खर्चाची भरपाई करतील.हे कोणतेही अंदाज नाहीत. हे तेच परिणाम आहेत, जेइन्क्रेडिबल इंडिया मोहिमेने प्रत्यक्षरीत्या सिद्ध करूनदाखवले होते. जागतिक पर्यटनामध्ये डिजिटलटेक्नॉलॉजी मोठे बदल घडवून आणत आहे. आणि हेच तेक्षेत्र आहे, ज्यातील भारताची अनुपस्थिती आपल्यासाठीमहागडी ठरत आहे. आज पर्यटनाशी संबंधित एकूणविक्रीपैकी 78% विक्री ऑनलाइन होते, 70% बुकिंगमोबाइल उपकरणांवर पूर्ण केली जाते आणि 45%व्यवहार ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातूनहोतात. स्पर्धेचे मैदान आता यूट्यूब प्री-रोल्स, सोशलमीडिया अल्गोरिदम, प्रोग्रॅमॅटिक डिस्प्ले आणिइन्फ्लुएन्सर नेटवर्कवर स्थलांतरित झाले आहे. हे असेचॅनेल्स आहेत, जिथे खर्चाचे मोजमाप केले जाऊ शकते,टार्गेटिंग अचूक असते आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचाजवळपास रिअल-टाइममध्ये अंदाज घेतला जाऊशकतो. भारताकडे पायाभूत सुविधा तर आहेत, परंतुत्यांचा लाभ उठवण्यात आपण अपयशी ठरलो आहोत.इन्क्रेडिबल इंडियाचे फेसबुकवर 19 लाख आणिइन्स्टाग्रामवर केवळ 7.85 लाख फॉलोअर्स आहेत.एवढेच फॉलोअर्स असलेल्या सौदी अरेबियाने जिथेएकाच महिन्यात 2.7 कोटी कंटेंट व्ह्यूज मिळवले, तिथेभारत केवळ 3.88 लाख व्ह्यूजपर्यंतच मर्यादित राहिला.मंच उपलब्ध आहे, परंतु भारत गेल्या एका दशकापासूनजागतिक मार्केटिंगच्या परिदृश्यातून पूर्णपणे गायब आहे.याची मोठी किंमत आपल्या पर्यटन क्षेत्राला मोजावीलागत आहे. केवळ मार्केटिंगही पुरेशी ठरणार नाही.आपल्याला मिशन मोडमध्ये पर्यटन क्षेत्राला डी-रेग्युलेटदेखील करावे लागेल. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, होमस्टे,वाहतूक ऑपरेटर आणि पर्यटन सेवा पुरवठादार हे अनेकपरवाने, प्रक्रिया आणि तपासण्यांच्या ओझ्याखाली कामकरतात. जे प्रकल्प इतर आशियाई देशांमध्ये 18 महिन्यांतपूर्ण होतात, त्यांना भारतात खूप जास्त वेळ लागतो.एकात्मिक परवाना व्यवस्था, डिजिटलायझेशन आणिस्वयंचलित नूतनीकरण लागू केले पाहिजे. आपल्याप्रत्येक राज्याला पर्यटनाचा अग्रदूत बनावे लागेल. प्रत्येकराज्याने 15 प्रमुख पर्यटन स्थळांची ओळख पटवून त्यांचाअशा एका सर्वसमावेशक पर्यटन इको-सिस्टममध्येविकास केला पाहिजे, ज्यामध्ये पोहोच, निवास, अनुभव,आयोजन, सुरक्षा, स्वच्छता, स्थानिक उद्योग आणिमार्केटिंग- या सर्वांचा समावेश असेल. एखादेडेस्टिनेशन केवळ तिथे रस्ते, हॉटेल्स किंवा संकेतकउपलब्ध आहेत म्हणूनच तयार मानले जाऊ शकत नाही.पर्यटन क्षेत्राची स्पर्धात्मकता आता यावरही अवलंबूनअसेल की एखादे डेस्टिनेशन कंटेंट-क्रिएटर्ससाठीअनुकूल आहे की नाही, ते सहजपणे ऑनलाइन शोधलेजाऊ शकते की नाही, ते व्यवहारासाठी तयार आहे कीनाही आणि त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो कीनाही. आपल्याला कंटेंट-क्रिएशन अर्थव्यवस्थेचाहीपर्यटनाची एक रणनीती म्हणून स्वीकार करावा लागेल.सरकारी मोहिमा जागरूकता निर्माण करू शकतात, परंतुविश्वास निर्माण करण्याचे काम कंटेंट-क्रिएटर्स करतात.एक उत्कृष्ट व्हिडिओ जो प्रभाव निर्माण करू शकतो, तोकोणतेही ब्रोशर करू शकत नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) 2.83 लाख नवीन रोजगार...एक परदेशी पर्यटक आपल्या प्रत्येकदौऱ्यात जीडीपीमध्ये 3,000 डॉलरचेयोगदान देतो. मार्केटिंगवर 20 कोटीडॉलरची गुंतवणूक 10 लाख अतिरिक्तपरदेशी पर्यटकांना आकर्षित करेल,ज्यातून 3.6 अब्ज डॉलरचे मूल्यनिर्माण होईल, 40 कोटी डॉलरचीजीएसटी प्राप्ती होईल आणि 2.83 लाखनवीन रोजगार निर्माण होतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




