Holi 2026 : येत्या मंगळवारी 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण महाराष्ट्रात काही मिनिटांसाठी प्रत्यक्ष पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते Da. Kr. Soman यांनी दिली आहे. ग्रहणाच्या वेळी चंद्र उगवतानाच तो ग्रहणावस्थेत दिसणार असल्याने हा खगोलप्रेमींसाठी एक वेधक अनुभव ठरणार आहे.
चंद्रग्रहण हे पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय प्रकार असून ते साध्या डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहता येते असे सोमण यांनी स्पष्ट केले. काही माध्यमांतून ग्रहणाबाबत भीती पसरवली जात असली तरी त्याला शास्त्रीय आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. विज्ञानयुगात अंधश्रद्धा बाजूला ठेवून शिक्षक आणि पालकांनी मुलांना प्रत्यक्ष चंद्रग्रहण दाखवून त्यामागील वैज्ञानिक कारणे समजावून सांगावीत असे आवाहन त्यांनी केले.
ग्रहणाची वेळ आणि महाराष्ट्रातील स्थिती
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येतो तेव्हा पृथ्वीची दाट सावली चंद्रावर पडते. या वेळी चंद्रबिंब काळसर-लालसर रंगाचे दिसते. पृथ्वीच्या ज्या भागात त्या वेळी चंद्र दृश्य आकाशात असतो तेथूनच हे ग्रहण पाहता येते.
3 मार्च रोजी दुपारी 3.20 वाजता चंद्रग्रहणास सुरुवात होईल; मात्र त्या वेळी चंद्र पूर्व क्षितिजाखाली असल्याने तो आपल्या दृश्य आकाशात दिसणार नाही. सायंकाळी 6.48 वाजता ग्रहण संपेल.
महाराष्ट्रातील विविध शहरांतील चंद्रोदयाची वेळ पुढीलप्रमाणे असेल:
मुंबई – सायं. 6.45
पुणे – सायं. 6.41
नाशिक – सायं. 6.40
कोल्हापूर – सायं. 6.40
नागपूर – सायं. 6.18
सोलापूर – सायं. 6.33
रत्नागिरी – सायं. 6.44
छत्रपती संभाजीनगर – सायं. 6.34
सर्वत्र चंद्रोदयापासून सायंकाळी 6.48 पर्यंतच ग्रहण पाहता येणार आहे. उदाहरणार्थ, मुंबईत चंद्रोदय 6.45 वाजता होईल आणि 6.48 वाजता ग्रहण सुटेल, त्यामुळे अवघ्या तीन मिनिटांसाठीच ग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे.
होळी आणि धूलीवंदनाबाबत स्पष्टता
दरम्यान, होळी सणाबाबतही सोमण यांनी शास्त्राधारित माहिती दिली आहे. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा सोमवार 2 मार्च रोजी सायंकाळी 5.55 वाजता सुरू होत आहे. त्या दिवशी प्रदोषकाळात पौर्णिमा असल्याने सोमवार 2 मार्च रोजीच होळीचे दहन करावे असे त्यांनी सांगितले.
मंगळवार 3 मार्च रोजी धूलीवंदन साजरे केले जाणार आहे. त्या दिवशी चंद्रग्रहण योग असल्याने धर्मशास्त्रानुसार होलिका दहन पूर्वदिवशी करणे योग्य ठरते. सोमवारी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात, भद्राकाळातही होलिका दहन करता येते असेही सोमण यांनी स्पष्ट केले.
राशीला ग्रहण कसे? सोमण यांचे उत्तर
ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आमच्या राशीला हे ग्रहण कसे आहे? असा प्रश्न विचारतात. त्यावर सोमण विनोदी पद्धतीने उत्तर देतात, जे लोक चंद्रग्रहण प्रत्यक्ष पाहतील त्यांच्या राशीसाठी ते शुभच आहे. कारण त्यांनी आलेल्या संधीचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी केला आहे असं ते म्हणतात.
शहर
- पुणे: सासरच्या जाचाचा कळस; विवाहितेला जबरदस्तीने 'डेटॉल' पाजले; पोलिसांत गुन्हा दाखल.
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- मुंबई: काँग्रेस पक्षाला सुनेत्रा पवारांबद्दल आदरच, पण त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवावे की त्या 'गुंगी गुडीया' नाहीत; विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य.
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
महाराष्ट्र
- पुणे: हवाई सुरक्षेला मोठा धोका! कचऱ्याचे ढीग आणि पक्ष्यांच्या वावरामुळे ५ वर्षांत ८०४ विमानांचे नुकसान.
- पुणे: सासरच्या जाचाचा कळस; विवाहितेला जबरदस्तीने 'डेटॉल' पाजले; पोलिसांत गुन्हा दाखल.
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- मुंबई: काँग्रेस पक्षाला सुनेत्रा पवारांबद्दल आदरच, पण त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवावे की त्या 'गुंगी गुडीया' नाहीत; विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य.
गुन्हा
- पुणे: सासरच्या जाचाचा कळस; विवाहितेला जबरदस्तीने 'डेटॉल' पाजले; पोलिसांत गुन्हा दाखल.
- पुणे: प्रेयसीच्या प्रियकराचा माजी प्रियकराकडून भीषण खून; सोलापूर महामार्गावर आरोपी जेरबंद
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!























Subscribe to my channel



