संघाला 100 वर्षे पूर्ण होत असतानाच सरसंघचालकडॉ. मोहन भागवत यांनीही आपल्या प्रतिमेत नाट्यमय बदलघडवून आणला आहे. त्यांनी आपले समर्थक आणिविरोधक या दोघांनाही संभ्रमात टाकले आहे. भागवत जोउदारमतवादी दृष्टिकोन स्वीकारत आहेत, त्यामुळे संघाच्याभक्कम वैचारिक पायाकडे दुर्लक्ष होत आहे, असे काहींनावाटत आहे. यातूनच असा एक गट पुढे आला आहे, जोजुन्या परंपरा व राष्ट्रवादाला चिकटून आहे. भागवतांच्यानेतृत्वाखाली संघ या विचारांपासून दुरावत आहे, असे यागटाचे मानणे आहे. उदारमतवादी गटातही काही असे लोकआहेत, ज्यांना भागवतांच्या भूमिकेमुळे दिलासा मिळालाआहे. हे बदलाचे वारे आहेत का? ते सरकारला सावधकरत आहेत का? ते संघाच्या जागतिक दृष्टिकोनालामध्यममार्गाच्या जवळ आणत आहेत का? इथे मी स्पष्टकरू इच्छितो की, संघाच्या मूळ विचारधारेत कोणताहीबदल होणार नाही. सध्या जे काही दिसत आहे, ते सत्तेच्या13 व्या वर्षातील राजकीय व्यावहारिकतेचे दर्शन आहे. गेल्या पाच वर्षांपासून, भागवत अनेक प्रमुख मुद्द्यांवरसंघाच्या भूमिकेतील बदल समोर आणत आहेत किंवासंघाची भूमिका वेगळ्या पद्धतीने मांडत आहेत. ते अनेकदाम्हणाले आहेत की, भारतातील (किंबहुना संपूर्णउपखंडातील) प्रत्येक व्यक्तीचा ‘डीएनए’ समान आहे. तोकोणत्या धर्माचा आहे, याने काही फरक पडत नाही. प्रत्येकमशिदीखाली शिवलिंग शोधणे थांबवा, असेही त्यांनीसांगितले आहे. भारताने पाकिस्तानसोबत संबंध कायमठेवायला हवेत, असे ते आणि त्यांचे उत्तराधिकारी मानलेजाणारे दत्तात्रेय होसबळेही म्हणाले आहेत की, दोन्हीदेशांमध्ये नाते कायम राहायला हवे. ते याला दोन्ही देशांतीलजनतेमधील संपर्काचे नाते म्हणू शकतील, पण हे सरकारच्याभूमिकेपेक्षा एक पाऊल पुढचे नाते आहे. हे सर्व एकाबदलाचे प्रतीक आहे. यामुळे कट्टरपंथी नाराज झाले आहेत,तर उदारमतवादी उत्साही. याच कारणांमुळे पाच प्रमुखमुस्लिम विचारवंतांनी 22 ऑगस्ट 2022 रोजी भागवतांशी संपर्क साधून संवादाची इच्छा व्यक्त केली होती. जर उदारमतवादी समाज मदतीसाठी संघ नेतृत्वाकडेपाहत असेल, तर भारताने प्रगतीच्या दिशेने काही पावलेटाकली आहेत, असे म्हणता येईल. तुम्ही याकडे संशयानेही पाहू शकता आणि आशेनेही. जेव्हा सरकार विशेषतःमोठ्या अडचणीत सापडते - जसे की जंतर-मंतर प्रकरण.तेव्हा ते उत्तम रक्षकाच्या भूमिकेत येतात. ज्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, ते संघाचेही महत्त्वाचे प्रस्थ होते. यापूर्वी काय काय म्हटले गेले, हे आधी पाहायला हवे.भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनीजेन-झीला ‘जेन गटर’ असे म्हटले होते. 30 जुलै रोजीसंघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी महाराष्ट्रामध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जंतर-मंतरवर राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या. तेम्हणाले की, डाव्यांच्या पर्यायी राजकारणाच्या विचारांची या आंदोलनात चांगलीच परीक्षा झाली आणि अशा अराजकतावादी शक्ती देशासाठी घातक आहेत. साहजिकच, भागवत या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते आणि सरकारच्या विरोधातील तरुणांच्या असंतोषाबद्दलचिंतेत होते. म्हणूनच त्यांनी भारताच्या ‘इंटरनॅशनल मूव्हमेंटटू युनायटेड नेशन्स’तर्फे आयोजित ‘जेन-झी आणिजेन-अल्फा’ यांच्यासोबतच्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाचेनिमंत्रण स्वीकारले. यामध्ये भागवतांनी सर्वात पहिले कामहे केले की, जेन-झी आंदोलकांना राष्ट्रविरोधी ठरवणाऱ्यासर्व टीका त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावल्या. ते म्हणाले,माझा जेन-झीवर पूर्ण विश्वास आहे. विरोध करणे हालोकशाही हक्क आहे, हे काही राष्ट्रविरोधी काम नाही.त्यांनी स्पष्ट केले की, विरोध आणि आंदोलने हा एकमतघडवण्याचा एक मूलभूत भाग असतो. तरुणांच्या तक्रारीआणि सुधारणांची मागणी अगदी रास्त आहे. शिक्षणावरजीडीपीच्या 6 टक्के एवढा निधी खर्च केला गेला पाहिजे,असेही ते म्हणाले. त्यांना जेव्हा विचारले गेले की, ते कोणत्या पिढीवर जास्तविश्वास ठेवतील, तेव्हा त्यांचे उत्तर होते जेन-झी. ते म्हणालेकी, विद्यार्थी आंदोलने हे लोकशाहीतील संवादाच्याप्रक्रियेचे एक रास्त आणि कायदेशीर अंग असतात.विशेषतः तेव्हा, जेव्हा संवादाचे सर्वसामान्य मार्ग बंद झालेलेअसतात. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले,तरुणांवर लादलेल्या गोष्टींपेक्षा ते संवादाला अधिक चांगलाप्रतिसाद देतात. त्यांच्याकडून डोळे झाकून आज्ञापालनाची अपेक्षा करू नका. तरुण पिढीचा आदर करा. यानंतर कंगना रनौत यांनी ‘जेन-झी राष्ट्रविरोधी आहे’ हा आपला सूर बदलला आणि संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्याम्हणाल्या की, जेन-झी ही आपली सर्वात मोठी ताकद आहेआणि आपल्याला त्यांचा अभिमान आहे. भागवतांकडूनयाहूनही महत्त्वाची समज तेव्हा दिली गेली, जेव्हा त्यांनातरुण पिढीला नेतृत्वाबद्दल मार्गदर्शन करण्याची विनंतीकरण्यात आली. त्यांना विचारण्यात आले की, त्यांच्या मतेभविष्यातील नेत्यांमध्ये कोणती तीन आदर्श वैशिष्ट्येअसायला हवीत? त्यांचे उत्तर होते की, सर्वप्रथम नेतृत्वम्हणजे टीमवर्क, म्हणजेच एक संघ म्हणून काम करणे. तेम्हणाले की, खरा नेता तोच असतो जो मागे राहून कामकरतो. त्याचबरोबर ते म्हणाले की, नेतृत्व त्यालाच म्हणतातजो नेते घडवतो, केवळ स्वतःच नेता बनून राहत नाही. आतात्यांचा रोख कुणाकडे आहे, यावरून प्रश्न निर्माण होतीलच. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तणावादरम्यानसंसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर इंदिरागांधी यांची एक जुनी क्लिप शेअर केली होती. ज्यामध्ये त्याएका विदेशी माध्यमाशी बोलताना आणीबाणीचे समर्थनकरत आहेत. इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, भारतालाबाहेरून आणि आतूनही धोका निर्माण झाला होता. त्याम्हणाल्या होत्या की, हे ते लोक होते, ज्यांना वाटत होते की तेनिवडणुकीच्या माध्यमातून जिंकू शकत नाहीत, म्हणून तेलढा रस्त्यावर आणतील. आता हा तर चर्चेचा विषय राहीलकी, खरंच इंदिरा गांधी एवढ्या अडचणीत सापडल्या होत्याका, ज्यामुळे त्यांना आणीबाणी लागू करण्याची चूक करावीलागली. पण आपल्याला माहीत आहे की, त्यांना याचुकीच्या धाडसाविरुद्ध सावध करणारी कोणतीही ताकदत्यांच्या पाठीशी नव्हती - कुणी वरिष्ठ सल्लागार,मार्गदर्शक, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरू नव्हता.कदाचित आज भागवत आणि संघ सरकारसाठी याचउणिवेची भरपाई करत आहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) उत्तम रक्षकाच्या भूमिकेत...उदारमतवादी समाज मदतीसाठी संघनेतृत्वाकडे पाहत असेल, तर भारतानेप्रगतीच्या दिशेने काही पावले टाकलीआहेत, असे म्हणता येईल. तुम्ही याकडेसंशयानेही पाहू शकता आणिआशेनेही. हेही शक्य आहे की, जेव्हासरकार अडचणीत असते, तेव्हा संघएका उत्तम रक्षकाच्या भूमिकेत येतो.-
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



