पुणे: पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे ढोल बडवणाऱ्या शासन आणि लोकप्रतिनिधींच्या दाव्यांची पोलखोल करणारी एक अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पवन धरणातील गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीत राहणाऱ्या गीताबाई चिंधू बोडके यांचे गुरुवार, ३० जुलै रोजी निधन झाले. मात्र, या पुनर्वसन वसाहतीत स्मशानभूमीसारखी अत्यंत मूलभूत आणि अत्यावश्यक सुविधाच उपलब्ध नसल्यामुळे, मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे अशक्य झाले. परिणामी, मृतदेह शुक्रवार, ३१ जुलै सकाळपर्यंत तब्बल रात्रभर घरातच ठेवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात आणि धरणग्रस्त वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
हवामानाचा अंदाज आणि मुसळधार पाऊस सुरू असताना अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करायचे तरी कुठे, असा मोठा प्रश्न शोकाकुल कुटुंबियांमसमोर व ग्रामस्थांसमोर निर्माण झाला होता. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सकाळी ९ वाजता जोवण–तिकोणा मार्गावर आक्रमक होत 'रास्ता रोको' आंदोलन केले. यावेळी शासन, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या प्रकल्पासाठी परिसरातील हजारो एकर बहुमोल जमीन संपादित करण्यात आली होती, ज्या बदल्यात अनेक कुटुंबांनी त्यांची हक्काची घरे, पिढ्यानपिढ्यांची शेती आणि हक्काची उपजीविका कायमची गमावली. पुनर्वसन करताना नागरिकांना सर्व प्रकारच्या आधुनिक व मूलभूत सुविधा देण्याची पोकळ आश्वसने देण्यात आली होती. मात्र, आजही स्मशानभूमीसारखी प्राथमिक सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे धरणग्रस्तांना आपल्या माणसांना मृत्यूनंतर सन्मानाने अखेरचा निरोप देणेही कठीण झाले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
निवडणुकीच्या काळात धरणग्रस्तांच्या समस्यांवर राजकारण करणारे अनेक नेते केवळ आश्वासनांची खैरात वाटतात; परंतु असा एखादा आपत्कालीन प्रसंग ओढवल्यास एकही लोकप्रतिनिधी मदतीसाठी किंवा धरणग्रस्तांच्या पाठीशी उभा राहत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीसाठी तातडीने स्मशानभूमीची हक्काची जागा मंजूर करून तिथे सर्व आवश्यक सुविधा विकसित कराव्यात, अन्यथा यापेक्षाही अधिक तीव्र आणि आक्रमक जनआंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा संतप्त ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




