महाराष्ट्रातील अॅप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी राज्य शासनाने नवीन आणि सर्वसमावेशक 'ॲग्रीगेटर धोरण' (Aggregator Policy) लागू केले आहे. अनेकदा प्रवाशांना ऐनवेळी विमानतळ, रेल्वे स्टेशन किंवा रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जायचे असते, अशा वेळी कॅब चालकांनी शेवटच्या क्षणी राईड रद्द केल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने नवीन नियमांमध्ये कडक तरतूद केली आहे. या नवीन नियमानुसार, जर एखाद्या चालकाने विमानतळ, रेल्वे स्टेशन किंवा रुग्णालयासाठी बुक केलेली राईड रद्द केली, तर त्याला मूळ भाड्याच्या तब्बल पाचपट दंड आकारला जाईल आणि ही दंडाची रक्कम थेट प्रवाशाच्या ॲप वॉलेटमध्ये जमा केली जाईल.
धोरणातील इतर प्रमुख तरतुदी व वैशिष्ट्ये:
-
चालकांसाठी आणि कंपन्यांसाठी शिस्त: अॅप-आधारित कॅब आणि रिक्षा सेवा पुरवणाऱ्या सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांना यापुढे महाराष्ट्रात अधिकृत परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यांचे भौतिक कार्यालय असणे अनिवार्य आहे. तसेच चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान, बिलाचा हक्क आणि प्रवाशांची सुरक्षा यावर भर देण्यात आला आहे.
-
भाड्याची रचना आणि कमाल मर्यादा: प्रवाशांच्या हिरक्षितीसाठी आणि लुटीस पायबंद घालण्यासाठी सर्ज प्राइजिंग (Surge Pricing) कमाल मर्यादेत ठेवण्यात आले असून ते मूळ भाड्याच्या १.५ पटीपेक्षा जास्त असणार नाही. तसेच एकूण भाड्याच्या किमान ८० टक्के रक्कम थेट चालकाला मिळणे बंधनकारक करण्यात आले आहे, ज्यामुळे चालकांच्या उत्पन्नाचे संरक्षण होईल.
-
पर्यायी वाहन व्यवस्था आणि सुरक्षा: प्रवास दरम्यान गाडीत काही तांत्रिक बिघाड झाल्यास, शहरात ३० मिनिटांत तर आंतरशहरी प्रवासात ६० मिनिटांत पर्यायी वाहन उपलब्ध करून देणे कंपन्यांना बंधनकारक असेल. तसेच प्रत्येक वाहनामध्ये रिअल-टाइम जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन बटण (Panic Button) आणि चोवीस तास सुरू असणारी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा (24x7 Call Center) असणे आवश्यक आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




