पुणे: जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाट परिसरात पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तब्बल दोन दिवस चाललेल्या अत्यंत खडतर शोधमोहिमेनंतर मुरबाड येथील सह्यगिरी रेस्क्यू टीमने या तरुणाचा मृतदेह दरीतून यशस्वीपणे बाहेर काढला.
दत्ता विनायक लोंढे (वय २२, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. दत्ता हा आपल्या तीन मित्रांसह नाणेघाट परिसरातील प्रसिद्ध 'नानाचा अंगठा' या पर्यटनस्थळी फिरण्यासाठी गेला होता. डोंगर चढत असताना कडाक्याची थंडी आणि वाऱ्यामुळे तो "मी अर्ध्या वाटेतून परत जातो," असे सांगून पार्किंगच्या दिशेने निघाल्याचे मित्रांनी सांगितले. मात्र, ठरलेल्या वेळी तो खाली गाडीजवळ न पोहोचल्याने मित्रांनी त्याचा शोध सुरू केला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेऊनही तो न सापडल्याने जुन्नर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच जुन्नर पोलीस, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सह्याद्री गिरी रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, दाट धुके, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे सोमवारी संध्याकाळी बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्याने मोहीम थांबवावी लागली. घटनास्थळी एक चप्पल आणि माती घसरल्याच्या खुणा आढळल्याने पाय घसरून तो दरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
मंगळवारी सकाळी मुरबाडच्या दिशेने पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. सुमारे साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सह्यगिरी रेस्क्यू टीमने दरीतून दत्ता लोंढे यांचा मृतदेह बाहेर काढला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शहर
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
- छत्रपती संभाजीनगर: एफडीएचा दणका; अस्वच्छता अन् धोकादायक पुनर्वापर केलेल्या तेलामुळे प्रसिद्ध 'उत्तम उपहारगृह'चा परवाना तडकाफडकी निलंबित
महाराष्ट्र
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- गोंदिया: लाडक्या भावाच्या निधनाचा तीव्र धक्का सहन न झाल्याने बहिणीचाही मृत्यू; एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य


























Subscribe to my channel



