मुंबई: आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेने दादर-पंढरपूर-दादर विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष रेल्वेच्या प्रत्येकी एका फेरीसह एकूण दोन फेऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, मुंबई आणि पुण्यासह उपनगरातील वारकऱ्यांना थेट पंढरपूर गाठणे सोपे होणार आहे. या विशेष रेल्वेचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी झाल्यास आणखी विशेष गाड्या चालविण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वेळापत्रक आणि मार्ग
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०४५ ही विशेष रेल्वे गाडी २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.५० वाजता दादर येथून सुटून त्याच दिवशी रात्री ९.१५ वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी, ट्रेन क्रमांक ०१०४६ ही विशेष रेल्वे २६ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता दादरला पोहोचेल.
महत्त्वाचे थांबे आणि रचना
या विशेष रेल्वेला प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डूवाडी येथे थांबे देण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान (स्लीपर), चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह एकूण १८ डबे असणार आहेत. वारकऱ्यांनी या विशेष सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहर
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
- पुणे: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एम्ब. डॉ. (एचसी) संजय मौर्य यांच्या पाचव्या एकल चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन.
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




