पुणे: पुणे शहरात चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पाषाण परिसरात एका सुरक्षारक्षकाला धमकावून रोख रक्कम लुटल्याची घटना घडली असून, बिबवेवाडी भागात उपाहारगृहातून मोठी रोकड चोरीस गेल्याची नोंद झाली आहे. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरात रामसुद्दीन उर्फ समीर चांदसाहेब कक्केरी (वय २६, सध्या रा. कीर्ती गार्डन, पाषाण, मूळ कर्नाटक) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कक्केरी हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत सुतारवाडी परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. सुरुवातीला “डेबिट कार्ड हरवले आहे” असा बहाणा करत संवाद साधल्यानंतर आरोपींनी त्यांना धमकावत खिशातील सुमारे ४० हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. या घटनेनंतर कक्केरी यांनी आरडाओरडा केला; मात्र आरोपी तेथून पसार झाले.
दरम्यान, कक्केरी यांनी ही रक्कम गावी पाठवण्यासाठी काढून ठेवली होती, अशी माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
याचदरम्यान, बिबवेवाडी–कोंढवा रस्त्यावरील एका उपाहारगृहात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी उपाहारगृहाच्या भटारखान्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील सुमारे २ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. शहरात वाढत असलेल्या अशा घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- पुणे: खडकवासला-फुरसुंगी बोगद्यातून २० हजार कोटींची जमीन मोकळी होणार! पाणी बचतीसह वाहतुकीलाही मिळणार मोठी चालना
महाराष्ट्र
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- अमरावती: दुष्काळदाह; लेकराप्रमाणे जपलेल्या संत्राची फळ तोडून फेकली! करोडोंचा फटका, झाडाला पाणी, अन्नरस पुरण्यासाठी शेतकऱ्यांची घालमेल
- पुणे: बारामती परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर! पोलिसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुप्रिया सुळे
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
गुन्हा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!


























Subscribe to my channel




