जुन्नर / ओतूर: जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील कोळवाडी येथे रविवारी सकाळी चोरीच्या संशयावरून एक अत्यंत थरारक आणि सिनेस्टाईल घटना घडली. संशयास्पद बोलेरो वाहनातून फिरणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, हातात गावठी कट्टे व इतर जीवघेणी हत्यारे असल्याने त्यांचे इतर तीन साथीदार हवेत हत्यारे चमकवत घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
नेमकं काय घडलं? ओतूर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनुसिंग पापसिंग दुधानी (वय ३५, रा. हडपसर, पुणे) आणि जिलूसिंग शेरसिंग दुधानी (वय ३८, रा. खोपोली, रायगड) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. संशयित आरोपी वापरत असलेले एमएच १७ एजे ३०७५ क्रमांकाचे बोलेरो वाहन हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोल्हार येथून चोरीला गेले असल्याचा संशय आहे.
रविवार सकाळी ही बोलेरो गाडी कोळवाडीतील एका हॉटेलजवळ संशयास्पद रितीने उभी होती. स्थानिक नागरिक विघ्नेश घोलप यांना ही गाडी ओळखीची वाटल्याने त्यांनी तेथे जाऊन वाहनाबाबत चौकशी केली आणि आरोपींकडे गाडीची चावी मागितली. यावरून संशयित आणि घोलप यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. वाद वाढताच गाडीतील आरोपींनी अचानक थेट हत्यारे बाहेर काढली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामस्थांचे धाडस आणि पाठलाग: हत्यारे निघाल्याची माहिती मिळताच कोळवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले. आरोपींनी गावठी कट्टे दाखवूनही ग्रामस्थांनी माघार घेतली नाही. त्यांनी धाडस दाखवून एका संशयिताला तिथेच जागेवर दबोचले, तर दुसरा पळून जात असताना शेजारील शेतात पाठलाग करून त्याला नागरिकांनी पकडले. या झटापटीत संतप्त नागरिकांनी पकडलेल्या दोघांना चांगलाच चोप दिला. मात्र, उर्वरित तीन साथीदारांनी त्यांच्याकडील गावठी कट्टे आणि तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवून ग्रामस्थांना चकवा दिला व पळ काढला.
वाहनातून हत्यारे जप्त, आरोपींवर अनेक गुन्हे: घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने धाव घेत दोन्ही जखमी आरोपींना ताब्यात घेतले आणि उपचारासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ताब्यातील दोन्ही संशयितांवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. तसेच त्यांच्या बोलेरो वाहनातून पोलिसांनी विविध प्रकारची घातक हत्यारे जप्त केली आहेत. फरार झालेल्या तिघांबाबत आरोपींनी माहिती देण्यास नकार दिला आहे.
सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे कोळवाडी परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
शहर
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
महाराष्ट्र
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- अहिल्यानगर: महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच! अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेडमधील भीषण अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



