रायगड: पाताळगंगा नदीत ३ हजार LPG सिलेंडर वाहून गेले; HPCL प्रकल्पाला पुराचा तडाखा ,प्रशासनाचा तातडीचा सुरक्षा इशारा

रायगड: मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीत तब्बल ३ हजार एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाड परिसरातील पूरस्थितीमुळे HPCL च्या एलपीजी बॉटलिंग प्रकल्पातून हे सिलेंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, पुराच्या तीव्र प्रवाहामुळे सिलेंडर नदीच्या विविध भागांत वाहून गेले आहेत. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सिलेंडर दिसल्यास त्यांना हात लावू नये किंवा हलवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणा सिलेंडर शोधण्याचे आणि सुरक्षितरीत्या परत मिळवण्याचे काम करत आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी त्वरित संपर्क साधण्यास सांगितले आहे. पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या भागात विशेष खबरदारी घेण्यात येत असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *