
Pune : कोथरुड, कर्वेनगर आणि वारजे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मेट्रो लाईन 4 आणि 4ए प्रकल्पाचे सादरीकरण आज नागरिकांसमोर करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मेट्रो सेवा आता पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचे सांगितले.
2016 मध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा अनेकांच्या मनात शंका होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या मार्गिका आणि नागरिकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मेट्रोने शहराच्या वाहतूक व्यवस्थेत ठळक स्थान निर्माण केले आहे, असे पाटील यांनी नमूद केले. त्यांनी हिंजवडी मेट्रो मार्गिका लवकर सुरू होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या कार्यक्रमात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मेट्रो प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रस्तावित लाईन 4 व 4ए बाबत सविस्तर माहिती दिली. या नवीन मार्गिकेमुळे कर्वेनगर, वारजे आणि कोथरुड परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होण्यास मदत होणार आहे. पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मेट्रो प्रशासनाने ठेवले आहे. तसेच ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी सुरू असलेल्या शटल बस आणि प्रीपेड रिक्षा सेवांचा नागरिकांना चांगला फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी सादरीकरणाबद्दल समाधान व्यक्त करत मेट्रो प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळाचा उल्लेख केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोथरुड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कसा असेल मार्ग?
मेट्रो लाईन 4 खराडी ते खडकवासला दरम्यान धावणार असून ही पूर्णपणे उन्नत मार्गिका सुमारे 25.52 किमी लांबीची असेल. या मार्गावर एकूण 22 स्थानकांचा समावेश असेल. तर मेट्रो लाईन 4ए नळ स्टॉप, वारजे आणि माणिक बाग या भागांना जोडणार आहे. या दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी सुमारे 31.636 किमी होणार असून 28 स्थानके असतील.
हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यामुळे सोलापूर मार्ग, कर्वे मार्ग, सिंहगड मार्ग तसेच मुंबई–बंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




