नाशिक: परिसरात तोतया पोलिसांकडून जबरी लूटीच्या घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत. आर्टिलरी सेंटररोडकडून मधल्या रस्त्याने दत्तमंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर तोतया पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकाला अडवून अंगावरील सोनसाखळी, अंगठी काढून ठेवण्यास सांगून हातचलाखीने लांबविल्याची घटना रविवारी (दि.६) घडली. याप्रकरणी दिलीप कचरदास संकलेचा (६८, रा. संकलेचा हाउस) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दत्तमंदिर रोडवरील स्नेह मंदिर सोसायटी शेजारील संकलेचा हाऊसमध्ये राहणारे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक दिलीप संकलेचा हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करून मित्रांसमवेत चहापाणी || घेऊन घराकडे परतत होते. चोरडीया यांच्या कारमधून ते सुराणा हॉस्पिटलजवळ उतरले. तेथून ते चालत जात असताना त्यांच्या पाठीमागून हेल्मेट परिधान करून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना अडविले, 'सध्या चोऱ्यांचे प्रकार खूप वाढल्याने अंगावरील दागिने काढून ठेवा' असे सांगितले. यावेळी हातचलाखीने त्यांनी दागिने घेऊन पलायन केले. उपनगर पोलीस ठाण्यात संकलेचा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पहिला डाव फसला
फिर्यादी संकलेचा यांची लूट करण्याच्या काही मिनिटांपूर्वी याच दोन तोतया पोलिसांनी आर्टिलरी सेंटररोडवर एका महिलेला अडवून फसविण्याचा प्रकार केला. मात्र त्या महिलेच्या अंगावर सोन्याचे दागिने नसल्याने त्यांचा प्रयत्न फसला; मात्र ते हेल्मेटधारी दुचाकीस्वार तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले.
कागदाची पुडी हाती देत ठोकली धूम
अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर संकलेचा यांनी विश्वास ठेवून गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी, रत्नजडीत एक तोळ्याची अंगठी असे सुमारे सहा लाखांचे दागिने घेऊन कागदाच्या पुडीची हातचलाखीने अदलाबदल करत धूम ठोकली. संकलेचा जेव्हा घरी पोहचले, तेव्हा त्यांनी तो कागद उघडून बघितला असता त्यामध्ये लहान दगडी खडे आढळून आले.
'पुढे खून झाला आहे, दागिने बॅगेत ठेवा' सांगून केले गायब
'पुढे खून झाला आहे. पोलिसांची तपासणी सुरू आहे. 'तुमच्या गळ्यातील सोने काढून बॅगेत ठेवा,' असे सांगत दोन तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेची दिशाभूल करून तिच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे सोन्याचे - दागिने हातचलाखीने लांबविले. रविवारी (दि. ६) सकाळी साडेसात वाजता अश्विननगर भागात ही जबरी - चोरी झाली. याप्रकरणी फिर्यादी स्मिता मिस्त्री (६३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी नेहमीप्रमाणे मिस्त्री या घरातून बाहेर पडल्या. वाटेत रिक्षा थांब्याजवळ त्यांना दोघा जणांनी 'आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालेला आहे. तपासणी सुरू असून, तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून सुरक्षितपणे गुंडाळून ठेवा' असे सांगून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून कागदात अथवा वस्तूमध्ये गुंडाळून ठेवण्याचा बनाव करत हातचलाखीने लंपास केले. काही वेळाने दागिने तपासले असता अडीच तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




