पुणे/मावळ:मावळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि ट्रेकर्सचा आवडता असलेल्या किल्ले विसापूरवर इतिहासाचा एक नवा आणि थक्क करणारा ठेवा प्रकाशात आला आहे. काही दिवसांपूर्वीच विसापूर गडाच्या उभ्या कातळात ५० फूट लांबीचे एक रहस्यमय प्राचीन भुयार शोधण्यात संशोधकांना यश आले होते. या शोधामुळे मावळच्या दुर्गइतिहासात आधीच मोठी खळबळ उडालेली असताना, आता याच गडावर आणखी एक मोठा शोध लागला आहे. विसापूर गडाच्या दक्षिण बाजूला एका अत्यंत दुर्गम आडवाटेवर अर्धवट कोरलेली प्राचीन अपरिचित लेणी, दोन पाण्याच्या टाक्या आणि एक विश्रांती कक्ष (Rest Chamber) आढळून आला आहे. या नवीन शोधामुळे मावळच्या लपलेल्या ऐतिहासिक वारशावर आता नवा प्रकाश पडणार आहे.
दुर्गसेवकांच्या जागरूकतेमुळे लागला शोध:
मावळ भागातील दुर्ग-संवर्धनाचे काम करणाऱ्या "सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान" या संस्थेचे दुर्गसेवक गडाच्या पायथ्याशी असलेल्या मालेवाडी भागातून एका अत्यंत अवघड आणि आडवाटेने विसापूर किल्ल्यावर जात होते. या मोहिमेदरम्यान त्यांना गडाच्या दक्षिण बाजूच्या कातळात हा प्राचीन आणि आजवर पूर्णपणे अपरिचित असलेला लेणी प्रकार आढळून आला. ही लेणी अर्धवट कोरलेल्या अवस्थेत असून, तिच्या अगदी जवळ खडकात कोरलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आणि प्रवाशांना किंवा सैनिकांना थांबण्यासाठी एक विश्रांती कक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इतिहास संशोधनात नवे प्रश्न आणि पर्वणी:
विसापूर गडाच्या कातळात आधी सापडलेले ५० फुटांचे कोरीव भुयार आणि आता लागलेला या प्राचीन लेणी अन् पाण्याच्या टाक्यांचा शोध, यामुळे इतिहास अभ्यासकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ही रचना नेमकी कशासाठी खोदली गेली असेल? तिचा वापर बौद्ध काळात ध्यानधारणेसाठी होत होता की मध्ययुगीन काळात संरक्षणासाठी आणि पाण्याच्या साठवणुकीसाठी केला जात होता? असे अनेक कुतूहल निर्माण करणारे प्रश्न आता समोर आले आहेत. इतिहास अभ्यासक आणि पुरातत्व प्रेमींसाठी हा शोध एक मोठी पर्वणी ठरणार असून, या संपूर्ण परिसराचे शासकीय पातळीवर सखोल संशोधन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत दुर्गसेवकांनी व्यक्त केले आहे.
शहर
- आषाढी वारी २०२६: वारकऱ्यांसाठी धावणार १२६० जादा बस; पंढरपूरच्या वारीसाठी 'एसटी'चे मराठवाड्यातील मोठे नियोजन!
- यशाची नवी व्याख्या! न्यूयॉर्कमधील आलिशान जीवन सोडून अमेरिकन जोडपे स्थायिक झाले इटलीत; सुखी आयुष्यासाठी घेतला मोठा निर्णय
- भागीदारी संस्थांनो सावधान! कलम १९४-टी (Section 194T) नुसार भागीदारांच्या पगार, व्याजावर १०% टीडीएस अनिवार्य; नियम मोडल्यास खर्च होणार नामंजूर
- पुणे-मुंबई प्रवास टाळा! मुसळधार पाऊस अन् भीषण दरडींमुळे एक्सप्रेसवे आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प; प्रशासनाचे प्रवाशांना महत्वाचे आवाहन
महाराष्ट्र
- यशाची नवी व्याख्या! न्यूयॉर्कमधील आलिशान जीवन सोडून अमेरिकन जोडपे स्थायिक झाले इटलीत; सुखी आयुष्यासाठी घेतला मोठा निर्णय
- भागीदारी संस्थांनो सावधान! कलम १९४-टी (Section 194T) नुसार भागीदारांच्या पगार, व्याजावर १०% टीडीएस अनिवार्य; नियम मोडल्यास खर्च होणार नामंजूर
- पुणे-मुंबई प्रवास टाळा! मुसळधार पाऊस अन् भीषण दरडींमुळे एक्सप्रेसवे आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प; प्रशासनाचे प्रवाशांना महत्वाचे आवाहन
- पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान! एक्सप्रेसवेवर भीषण दरड कोसळली, दोन्ही हायवे बंद; इंद्रायणीला पूर, आळंदीत दुकानांमध्ये शिरले पाणी
गुन्हा
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
- उत्तर प्रदेश: पतीची हत्या करून मृतदेह बाथरुमच्या फरशीखाली गाडला; ४५ दिवस मृतदेहावरच आंघोळ केली!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!
- म्हैसूर दसऱ्याच्या 'जंबो सवारी'चा मानकरी; प्रसिद्ध 'अभिमन्यू' हत्तीचा सुळा तुटला! वन विभागाकडून उपचार सुरू


























Subscribe to my channel




