देश सध्या भीषण उष्णतेच्या तडाख्यात आहे. तापमानसातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. जेव्हा मीलोकांना विचारतो की पुढच्या वर्षी उष्णता कमी होईल कीजास्त, तेव्हा बहुतांश लोक काही क्षण विचार करूनम्हणतात- कदाचित आणखी जास्त. हे उत्तर केवळ अंदाजनाही, तर एक कठोर सत्य आहे. पृथ्वी पूर्वीपेक्षा अधिकवेगाने तापत असल्याने पुढच्या वर्षी परिस्थिती आपोआपसुधारेल असे गृहीत धरून चालणे म्हणजे स्वतःला भ्रमातठेवणे आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की येणाराकाळ अधिक भयावह होऊ नये म्हणून आज आपण कायकेले पाहिजे. जगभरात पर्यावरण संरक्षण, तांत्रिक विकास,नवीन धोरणे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांवर सातत्याने कामसुरू आहे. असे असूनही हवामान संकट आपल्याडोळ्यांसमोर वेगाने वाढत आहे. याचा अर्थ ही समस्या खूपखोलवर आहे. मला वाटते की मानवी समाज या संदर्भाततीन मूलभूत चुका करत आहे. पहिली चूक ही कीआपण निसर्गाची संसाधने- कोळसा, पेट्रोल, डिझेल आणिनैसर्गिक वायूला आपले भांडवल समजून बसलोत.कोणत्याही व्यवसायात जर तुम्ही तुमचे भांडवलच खर्चकरू लागलात, तर तो व्यवसाय फार काळ टिकू शकतनाही. ‘स्मॉल इज ब्युटीफुल'' या प्रसिद्ध पुस्तकात ई. एफ.शुमाकर यांनी 1973 मध्येच चेतावणी दिली होती की,मानवी समाज पृथ्वीचे नैसर्गिक भांडवल आपल्याउत्पन्नासारखे खर्च करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि यंत्रेआपण बनवली आहेत, त्यांचा वापर करणे योग्य आहे. पणकोट्यवधी वर्षांत तयार झालेले जीवाश्म इंधन आपणबनवलेले नाही. ते निसर्गाचे भांडवल आहे. जर आपण तेचभांडवल सातत्याने जाळत राहिलो, तर दिवाळखोरीनिश्चित आहे. दुसरी चूक अशी, आपले उत्पादन व उपभोग यातीलवाढ अनंतकाळापर्यंत चालेल, असे आपण गृहीत धरूनचाललोत. विज्ञान वाढत आहे, तंत्रज्ञान वाढत आहे,अर्थव्यवस्था वाढत आहे, पण पृथ्वी वाढत नाहीये. तिचीसंसाधने मर्यादित आहेत. मर्यादित पृथ्वीवर अमर्याद उपभोगकधीही शक्य होऊ शकत नाही. पण आपण विकासाचीसंपूर्ण व्याख्याच अधिक उत्पादन आणि अधिक उपभोगावरआधारित केली आहे. तिसरी आणि कदाचित सर्वातमोठी चूक ही आहे की, पर्यावरण आणि हवामान बदलाचीसमस्या सरकार सोडवेल असे आपण मानतो. वास्तव कीही समस्या कोणत्याही एका सरकारने किंवा उद्योगाने निर्माणकेलेली नाही. ही समस्या आपण सर्वांनी मिळून निर्माणकेली आहे. आपण जे कपडे घालतो, जे खातो, जे खरेदीकरतो, जितकी वीज वापरतो, जितका प्रवास करतो- यासर्वांचा थेट संबंध कार्बन उत्सर्जनाशी आहे. त्यामुळे याचेसमाधानही केवळ सरकारांकडून येणार नाही. जोपर्यंतप्रत्येक व्यक्ती स्वतःची जबाबदारी समजून घेत नाही,तोपर्यंत कोणतेही धोरण पुरेसे ठरणार नाही. म्हणूनच मलावाटते की आज जगाला सर्वात जास्त गरज क्लायमेटसत्याग्रहाची आहे. सत्याग्रहाचा अर्थ केवळ विरोध नाही,तर सत्याचा आग्रह धरणे हा आहे. आजचे सर्वात मोठे सत्यहे आहे की पृथ्वी मर्यादित असल्याने आपले जीवन आणिउपभोगही मर्यादित असायला हवा. क्लायमेट सत्याग्रहाचाअर्थ आहे स्वेच्छेने मर्यादित आणि जबाबदार जीवनशैलीस्वीकारणे; आपली गरज आणि हाव यातील फरक समजूनघेणे; आणि निसर्गाच्या संसाधनांचा वापर अधिकार म्हणूननाही तर जबाबदारी म्हणून करणे. जर आपण क्लायमेटसत्याग्रह स्वीकारला, तर तो आपल्या तिन्ही चुकांवर उपायठरू शकतो. हे आपल्याला अमर्याद उपभोगाच्या शर्यतीतूनबाहेर काढून संतुलित जीवनाकडे घेऊन जाईल. आणिसर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे लोकांना केवळ प्रेक्षक न ठेवतासमाधानाचा भागीदार बनवेल. आता वेळ केवळ चर्चेचीनाही, तर वैयक्तिक जबाबदारीची आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



