शिक्षकी पेशात असलेले वडील, सरकारी रुग्णालयात डॉक्टर असलेला मोठा भाऊ आणि स्वतः होमिओपॅथीच्या (BHMS) तिसऱ्या वर्षात शिकणारा हुशार तरुण; अशा एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील २५ वर्षीय मुलगा अचानक मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना आढळल्याची एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, मालाड पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे या तरुणाची सुखरूप सुटका झाली असून, तो पुन्हा आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित छायेत परतला आहे.
अभय सुरेश बेळकोनी असे या २५ वर्षीय तरुणाचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील तामसा गावचा रहिवासी आहे. अभय अभ्यासात प्रचंड हुशार असून त्याला बारावीत ८० टक्के गुण मिळाले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी तो मानसिक तणावाखाली होता. सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी तो अचानक घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडला. ट्रेनने प्रवास करत तो आधी इंदूरला गेला आणि तिथून पुन्हा मुंबईत आला. या प्रवासादरम्यान त्याची शैक्षणिक कागदपत्रे, पैसे आणि मोबाईल असलेली बॅग चोरीला गेली. बॅगेतच घरातील सदस्यांचे संपर्क क्रमांक असल्याने तो प्रचंड घाबरला आणि त्या धक्क्यातून त्याची मानसिक स्थिती अधिकच खालावली. मुंबईत पोहोचल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी आणि गावी जाण्यासाठी पैसे जमा करण्याकरिता तो रेल्वे प्लॅटफॉर्म, बसस्टॉप आणि मंदिराबाहेर फिरू लागला. शेवटी त्याच्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली.
मुंबईत भिक्षेकऱ्यांविरोधात सुरू असलेल्या एका नियमित मोहिमेदरम्यान, मालाड येथील एस. व्ही. रोड परिसरात पहाटेच्या वेळी बीट मार्शल अंमलदार कोमलसिंग जाधव यांना एक तरुण अत्यंत थकलेल्या, मळक्या कपड्यात आणि विस्कटलेल्या अवस्थेत भीक मागताना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी याची आपुलकीने चौकशी केली असता, "मला गावी जायचे आहे आणि त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी मी गेल्या तीन दिवसांपासून भीक मागतोय," असे त्याने सांगितले.
त्याची दयनीय अवस्था आणि मानसिक स्थिती ठीक नसल्याचे ओळखून पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्याला अंघोळ घालून, नवीन कपडे आणि प्रेमाने खाऊपिऊ देऊन विश्वासात घेण्यात आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनीषा कागलकर यांनी त्याच्याशी मायेने संवाद साधला. हळूहळू अभयने त्याचे नाव आणि गाव तामसा (नांदेड) असल्याचे सांगितले.
या माहितीच्या आधारे मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने नांदेडच्या तामसा पोलिसांशी संपर्क साधला. तिथून समजले की कुटुंबाने अभय हरवल्याची तक्रार आधीच नोंदवली होती. अभय मुंबईत सुखरूप असल्याची माहिती मिळताच त्याचे शिक्षक असलेले वडील तातडीने मुंबईत दाखल झाले.
पोलीस ठाण्यात मळक्या कपड्यात आणि अशा अवस्थेत असलेल्या आपल्या पोटच्या मुलाला पाहताच वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी धावत जाऊन अभयला घट्ट मिठी मारली. हा बाप-लेकाचा भावनिक मेळावा पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. योग्य वेळी मदत करून मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवल्याबद्दल या सुशिक्षित कुटुंबाने मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




