पुणे: जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अत्यंत भावुक वातावरणात पार पडले. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालाही अजित पवार यांचे नाव देण्यात आले आहे. या ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्याप्रसंगी बोलताना विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या. आपल्या पतीच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांचा कंठ दाटून आला आणि उपस्थितांचेही डोळे पाणावले.
भाषणादरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. त्यामुळे दुःखाने खचून न बसता आदरणीय दादांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी घेऊन मी आज आपल्यासमोर उभी आहे. दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही नक्की पूर्ण करू."
पुणे जिल्हा परिषदेशी दादांचे विशेष नाते: पुणे जिल्हा परिषदेबद्दल अजित पवार यांना असलेले प्रेम व्यक्त करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "आजचा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे. ज्या पुणे जिल्हा परिषदेवर आदरणीय दादांनी मनापासून आणि जीवापाड प्रेम केले, ज्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, आज त्याच जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप मोठी गोष्ट आहे. दादांच्या कामातून उभी राहिलेली ही पुणे जिल्हा परिषदेची वास्तू आजही त्यांच्या कामाची पावती देत आहे."
छत्रपती कारखाना ते उपमुख्यमंत्रीपदाचा प्रवास: अजित पवारांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून सुरू झालेला दादांचा प्रवास राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. परंतु, इतक्या मोठ्या पदावर पोहोचूनही त्यांनी आपला ग्रामीण बाज कधीच सोडला नाही. त्यांच्याकडे अफाट काम करण्याची आणि कष्ट करण्याची जिद्द होती. शेती, सहकार आणि ग्रामीण विकासासाठी ते नेहमीच केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करत असत.
दादांच्या स्वभावाचे आणि निसर्गप्रेमाचे किस्से: अजित पवारांच्या सहवासातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "बाहेरून कठोर वाटणारे दादा आतून अत्यंत संवेदनशील होते. त्यांचे झाडांवर आणि निसर्गावर खूप प्रेम होते, म्हणूनच त्यांनी प्रत्येक गावात एक झाड लावले. दादांच्या निधनानंतर मी राज्यातील अनेक गावांचे आणि शहरांचे दौरे केले. त्या प्रत्येक ठिकाणी लोकांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी शब्दांतून भावना व्यक्त केल्या, काहींनी मोबाईलमधील जुने फोटो दाखवले, तर काहींनी आपल्या डोळ्यांतील अश्रूंनी दादांना श्रद्धांजली वाहिली." पुणे जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती: या महत्त्वाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवार कुटुंबातील पार्थ पवार आणि जय पवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव प्रमुख पाहुणे म्हणून होते, मात्र ते उपस्थित राहू न शकल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जून हजेरी लावली. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले; या क्षणी त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
- मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दालनाचं उद्घाटन कोण करणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
- पुणे: पुण्यात खोटा आयएएस अधिकारी असल्याचा बनाव; २१ वर्षीय तरुणाने उच्चभ्रू सोसायटीला गंडवले ३५ लाख
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
- मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दालनाचं उद्घाटन कोण करणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
- सातारा: फलटणमधील दुर्देवी घटना; फटाक्यांच्या पिशवीत ठिणगी पडल्याने गंभीर भाजलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू"
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
गुन्हा
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन


























Subscribe to my channel



