नाशिक येथील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ, धार्मिक दबाव आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाला आता मोठे कायदेशीर वळण मिळाले आहे. या बहुचर्चित आणि संवेदनशील प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र आणि विशेष न्यायालयात तब्बल १५०० पानांचे पहिले आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. या आरोपपत्रात तंत्रज्ञान क्षेत्रातील या मोठ्या कंपनीत झालेल्या गंभीर गैरप्रकारांवर प्रकाश टाकण्यात आला असून तपासादरम्यान गोळा केलेले अनेक महत्त्वपूर्ण पुरावे जोडण्यात आले आहेत.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने आणि याला सामाजिक परिमाणे असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती. 'देवलाली कॅम्प' पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या (सीआर नंबर १५६/२६) आधारे हे पहिले आरोपपत्र एकूण ४ मुख्य आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दानिश एजाज शेख, तौसीफ बिलाल अत्तर, निदा एजाज खान आणि मतीन माजिद पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या (SC/ST Act) संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश:
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करणे आणि त्यांच्यावर धार्मिक दबाव आणणे हा एक सुनियोजित गुन्हेगारी कटाचा भाग होता, याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दाखल करण्यात आलेल्या या १५०० पानांच्या आरोपपत्रात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जोडले गेले आहेत. यामध्ये मुख्य आरोपींच्या मोबाईल फोनचा क्लोनिंग अहवाल, व्हॉट्सॲप चॅट्स, संभाषणांचे स्क्रीनशॉट्स, ईमेल ट्रेल आणि इतर महत्त्वाच्या डिजिटल रेकॉर्डचा समावेश आहे. याशिवाय, पीडितेची ओळख लपवून तिचे नाव बदलण्याचा प्रयत्न दर्शवणारे काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आतापर्यंत १७ महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १८३ अंतर्गत न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवले आहेत. या कर्मचाऱ्यांवर कामाच्या ठिकाणी छळ करणे, अयोग्य शेरेबाजी करणे आणि अधिकाराचा गैरवापर करून मानसिक दबाव निर्माण केल्याचे आरोप इतर एफआयआरच्या माध्यमातूनही समोर आले होते. या पहिल्या आरोपपत्रानंतर आता या संपूर्ण प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांवर आणि या कटाच्या आर्थिक बाजूवरही (Funding Angle) पोलिसांचा पुढील तपास केंद्रित असणार आहे.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
- राजगड: गोळीबाराने खळबळ! ४७ वर्षीय व्यक्तीवर झाडली गोळी; आरोपीला पोलिसांकडून अवघ्या ८ तासांत अटक!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




