कल्याण: अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी कल्याणचे पोलीस उपायुक्त आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) ठाणे जिल्ह्यातील आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्कर टोळीचा म्होरक्या अमजद पठाण याच्यासह एकूण पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ३४ कोटी १८ लाख रुपये किमतीचे ९ किलोपेक्षा जास्त वजनाचे उच्च दर्जाचे हेरॉईन (गर्द) जप्त केले आहे.
गस्तीदरम्यान संशयातून लागला छडा:
या संपूर्ण मोठ्या कारवाईची सुरुवात १ एप्रिल रोजी झाली. कल्याण पश्चिमेकडील सांगळेवाडी परिसरात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी पथकाची गस्त सुरू होती. यावेळी तेथे दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्या. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्यांना पाठलाग करून तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्या पाठीवरील बॅगेची झडती घेतली असता, पोलिसांनी त्यामध्ये तब्बल ९ किलो २३६ ग्रॅम हेरॉईन सापडले, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३२ कोटी ३२ लाख ६० हजार रुपये आहे. पोलिसांनी कासीम अब्दुल सत्तार वसईकर (३८) आणि कृष्णा नागप्पा हळेमणी (३६) या दोघांना अटक केली.
घराच्या झडतीतून आणखी साठा जप्त:
पोलीस कोठडीत असताना आरोपी कासीम वसईकर याच्या शहापूर येथील घराची झडती घेण्यात आली. तेव्हा पोलिसांनी त्याच्या घरातून आणखी ५३१.६९ ग्रॅम हेरॉईन मिळाले, ज्याची किंमत सुमारे १ कोटी ८५ लाख ८५ हजार रुपये आहे.
नाशिक-कल्याण-मुंबई कनेक्शन आणि किंगपिनला अटक:
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, अधिकारी अनिल गायकवाड आणि जितेंद्र ठोके यांच्या पथकाने सखोल तपास केला असता, या आंतरराज्यीय रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि किंगपिन कुख्यात अमजद युसूफ पठाण (४७) असल्याचे समोर आले. या टोळीचे जाळे नाशिकहून कल्याणमार्गे मुंबईत अमली पदार्थांचा पुरवठा करत होते. अमजद पठाण हा कासिम आणि सद्दाम शेखला माल पुरवायचा आणि ते दोघे कृष्णा व गणेश जंगमार ऊर्फ अण्णा (७१) यांच्या माध्यमातून मुंबई-ठाण्यात त्याचे वितरण करत होते. पोलिसांनी सद्दाम शेख आणि गणेश जंगमार यांनाही अटक केली.
मुख्य सूत्रधार अमजद पठाण हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे लपून बसला होता. पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.
मुख्य आरोपीवर २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे:
टोळीचा मुख्य म्होरक्या अमजद पठाण हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात खून, अमली पदार्थ तस्करी आणि 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत तब्बल २० गंभीर गुन्हे दाखल आहेत. कल्याण न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता पोलीस उपायुक्तांनी व्यक्त केली आहे.
शहर
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- डिजिटल क्रांती! महाराष्ट्र बनणार देशातील सर्वात मोठे 'डेटा सेंटर हब'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
- दलाल स्ट्रीटचा कुख्यात घोटाळेबाज केतन पारेख पुन्हा सक्रिय! 'बॉस' आणि 'जॅक' नावाने चालवला ६६ कोटींचा नवा फ्रंट-रर्निंग घोटाळा!
महाराष्ट्र
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- डिजिटल क्रांती! महाराष्ट्र बनणार देशातील सर्वात मोठे 'डेटा सेंटर हब'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
- दलाल स्ट्रीटचा कुख्यात घोटाळेबाज केतन पारेख पुन्हा सक्रिय! 'बॉस' आणि 'जॅक' नावाने चालवला ६६ कोटींचा नवा फ्रंट-रर्निंग घोटाळा!
गुन्हा
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
- दलाल स्ट्रीटचा कुख्यात घोटाळेबाज केतन पारेख पुन्हा सक्रिय! 'बॉस' आणि 'जॅक' नावाने चालवला ६६ कोटींचा नवा फ्रंट-रर्निंग घोटाळा!
- पामबीच मार्गावर थरारक अपघात अन् 'ड्रग्ज'चा काळाबाजार उघड! कारमधून ७० लाखांची अफू, पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त; चालक फरार!
- पुणे पोलिसांचा मोठा दणका! बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ तस्करांना बेड्या!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक सवाल; 'जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर मुलांना आरक्षणाची काय गरज?'
- पुणे पोलिसांचा मोठा दणका! बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ तस्करांना बेड्या!
- क्रिप्टो युजर्सना मोठा दिलासा! डीपफेक फ्रॉड रोखण्यासाठी 'बायनान्स' वापरणार प्रगत AI तंत्रज्ञान!
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!





















Subscribe to my channel


