पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:गोमातेचे रक्षण करा, जेणेकरून‎ मानवी जीवनाचे रक्षण होईल

3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

काही व्यक्तींच्या संकल्पांनी जग बदलले आहे. आज वैशाख शुद्ध नवमी ‎असून आश्लेषा नक्षत्रही आहे. विद्वानांच्या मते, याच दिवशी अग्रवाल ‎समाजाचे पूर्वज महाराजा अग्रसेन यांनी एका यज्ञाचा संकल्प केला होता,‎जो 17 दिवस चालला. 18 व्या दिवशी त्यांनी शपथ घेतली की, यापुढे‎ पशुबळी दिला जाणार नाही आणि माझे वंशज आजपासून क्षत्रिय‎ धर्माऐवजी वैश्य धर्म स्वीकारतील.

ही तिथी यंदा 12 मे रोजी येईल. त्यांनी‎ म्हटले होते की, आता माझे वंशज व्यापार, शेती आणि गोसेवा हे केवळ ‎कर्तव्य नसून सेवा मानूनच करतील, जे आजता गायत पाळले जात ‎आहे. 27 एप्रिल रोजी ‘गोसन्मान दिवस’ साजरा केला जात आहे.‎ गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, याचा एकच अर्थ आहे की, लोकांना ‎हे समजून घ्यावे लागेल की निसर्ग हा ईश्वराचा प्रतिनिधी आहे आणि ‎निसर्गाची जिवंत प्रतिनिधी गोमाता आहे. गायीचे रक्षण केल्याने मानवी‎ जीवनात ज्या चांगल्या गोष्टी घडतील, त्यातील एक म्हणजे मनाला ‎शांती लाभेल. 27 एप्रिल रोजी संकल्प करा की, आपण गोमातेचे रक्षण‎यासाठी करू, जेणेकरून मानवाचे रक्षण होईल.‎‎

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *