सयाजी शिंदे, अजित पवार, शरद पवारImage Credit source: Tv9
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही जोर धरला आहे. अशातच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे बोलणं आमच्यासमोर झालं होतं, दोन्ही NCP नं एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं, असं सयाजी शिंदे म्हणाले. दादांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, अशी इच्छा सयाजी शिंदेंनी बोलून दाखवली आहे. राज्याची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, असंही म्हणाले आहेत.
“सर्वधर्मसमभाव ठेवून, गरीब-श्रीमंत न बघता, खालून आल्यामुळे त्यांनी सर्व इतकं पुढे नेण्याचं ठरवलं होतं. मला असं वाटतं की, त्यांची स्वप्नं ही आपण सर्वांनी आणि खासकरून सुनेत्रा वहिनींनी, सुप्रियाताईंनी पूर्ण करावीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं, हे दादांचं पहिलं स्वप्न होतं. हे त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, तरच महाराष्ट्राला खरी ताकद मिळेल. महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबीय ताबडतोब एकत्र यायला पाहिजेत”, असं मत सयाजी शिंदे यांनी मांडलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती, असा दावा त्यांनी यावेळी केला. याविषयी ते पुढे म्हणाले, “कौटुंबिक भावना बाजूला सारून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती. पण अचानक हे सर्व घडलं. कोणीकाही या गोष्टीला वेगळा मार्ग न लावता, त्याआधी दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले, तर महाराष्ट्र पुढे जाईल.” सयाजी शिंदेंनी नुकतीच सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.
“अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. काहीतरी सुचायलाही खूप वेळ जातोय, काय बोलावं हेच सुचत नाहीये. आज मी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. काय बोलावं हेच कळत नव्हतं. त्यानंतर मोठ्या साहेबांचीही भेट घेतली. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. निवडणुकीच्या वेळी, प्रचाराच्या वेळी अशी चर्चा झाली होती की आता एकत्रच येणार आहोत. फक्त औपचारिकता राहिली होती. असं असताना असं अचानक काहीतरी व्हावं, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट झालं आहे”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


