
Pune : येत्या मार्च महिन्यात पुणेकरांना एक विशेष भेट मिळणार आहे. पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार असून प्रवासाचा वेळ लक्षणीरित्या कमी होणार आहे. हिंजवडी ते शिवाजी नगरपर्यंत प्रवास करायला सध्या 2 तास लागतात. हा वेळ सरळ अर्ध्या तासावर येणार आहे. त्यासोबतच काल जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात पुण्यातील मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी 517 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली गेली आहे.
मेट्रो 3 मार्चमध्ये
मार्चमध्ये सुरू होणाऱ्या नव्या मेट्रो आणि या विस्तारामुळे येत्या काही वर्षांत पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली या चाचण्या पूर्ण झाल्या असून मार्चच्या उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे.
|
|
ही मेट्रो मार्गिका शिवाजीनगरला पुण्यातील राजिव गांधी IT पार्कशी थेट जोडणार आहे. या मार्गावर दररोज IT कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीही खूप होते. 2.2 लाखाहून अधिक कर्मचारी या मार्गावर प्रवास करत असतात. 800 कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
विद्यापीठ चौकात या मेट्रोवरती डबल डेकर वाहतूक मार्ग उभारणार आहेत. यामुळे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या भागातील कोंडी फोडण्यात यश मिळणार आहे. यामध्ये सर्वात खालच्या स्थरावर स्थानिक वाहनांची वाहतूक, त्यावरील उड्डाणपूलावर आणखी एक वाहतूक मार्ग आणि त्यावरती मेट्रो मार्गिका असणार आहे. या मार्गिकेवर एकूण 23 स्थानके आहेत. संपूर्ण मार्गासाठी 14 ट्रेनसेट तयार असून पुणेकर आतुरतेनं या मेट्रोची वाट पाहत आहेत.
कसा होणार विस्तार?
काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात महा मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार करण्याबाबत माहिती देण्यात आली. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन मार्गिका सुरू असून, तिसरी प्रवाशांसाठी लवकरच सुरू होईल. तसेच, 2027पर्यंत पिंपरी-निगडी अशी 4.5 किमी लांब मेट्रोचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गिकेचं 50 टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात विस्तारामध्ये खडकवासला-स्वारगेट-खराडी, रामवाडी-वाघोली-विठ्ठलवाडी, वनाज-चांदणी चौक आणि नल स्टॉप-वारजे या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel


2 thoughts on “Pune Metro : मेट्रो विस्तारासाठी ५१७ कोटींचा निधी मंजूर; हिंजवडी–शिवाजीनगर, पिंपरी, स्वारगेट—मार्ग कुठे, कसे असतील”