मुंबई: गोरेगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक, मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरखर्चाचा खर्च आणि आजारी आईच्या उपचाराच्या खर्चावरून झालेल्या क्षुल्लक वादातून एका कलयुगी मुलाने आपल्याच ६२ वर्षीय वृद्ध आणि पक्षघाताने (पॅरालाईज्ड) ग्रस्त असलेल्या आईला बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत महिला साधना भोलेनाथ कारंडे (वय ६२) या मागील एका वर्षापासून पक्षघात (पॅरालेसिस) या आजाराने ग्रस्त असल्यामुळे अंथरुणावरच होत्या. दरम्यान, आरोपी मुलगा अभिषेक कारंडे हा सतत घरखर्चासाठी आणि आईच्या उपचारासाठी पैसे देण्यावरून घरच्यांशी वाद घालत असे. ८ नोव्हेंबरला तिचे वडील भोलेनाथ हे जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी तिचा दुसरा मुलगा प्रथमेश हा आपली ६ वर्षांची मुलगी आणि भाऊ अभिषेकसोबत राहत होता. संध्याकाळी प्रथमेश हा त्याच्या मुलीला घेऊन गोरेगाव रेल्वे स्थानकाकडे शॉपिंगसाठी गेला होता. सुमारे पावणेआठच्या सुमारास जेव्हा प्रथमेश घरी परतला, तेव्हा त्याला त्याची आई साधना ही घरातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली.
रक्ताच्या थारोळ्यात सापडली आई, आरोपी मुलगा झोपेत: घरी आल्यावर प्रथमेशला त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसली, तर तिच्याच शेजारी तिचा दुसरा मुलगा आरोपी अभिषेक हा दारूच्या नशेत गाढ झोपलेला होता. आईच्या डोक्यातून व चेहऱ्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते आणि घरातील सामायिक वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. प्रथमेशने विचारणा केली असता, आरोपी अभिषेकने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर आपणच आईच्या डोक्यात प्रहार करून मारहाण केल्याची कबुली दिली. तसेच त्याने प्रथमेशलाही जीवे मारण्याची धमकी दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने आणि तातडीने हस्तक्षेप करत गंभीर जखमी असलेल्या साधना कारंडे यांना उपचारासाठी जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते.
हत्येच्या गुन्ह्यात रूपांतर आणि अटक: या प्रकरणी सुरुवातीला मोठा भाऊ प्रथमेश कारंडे याच्या तक्रारीवरून बांगुरनगर पोलीस ठाण्यात आरोपी अभिषेक कारंडेविरुद्ध हत्येचा प्रयत्न (कलम ३०७) यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी अभिषेकला तातडीने बेड्या ठोकल्या आणि त्याला पोलीस कोठडीत पाठवले. दरम्यान, जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) दुर्दैवाने साधना कारंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करत आता अभिषेकविरुद्ध हत्येचा (मर्डर) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया तीव्र केली असून आरोपीला बोरिवली येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे. वृद्ध आणि आजारी आईची पोटच्या मुलानेच अशा प्रकारे निर्दयपणे हत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
- पुणे: जेजुरीत नगरपालिकेचा ३९ गुंठ्यांचा भूखंड गेला कुठे? प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जेजुरीत पुकारला 'हलगीनाद' आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
- पुणे: जेजुरीत नगरपालिकेचा ३९ गुंठ्यांचा भूखंड गेला कुठे? प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जेजुरीत पुकारला 'हलगीनाद' आंदोलन!
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!

























Subscribe to my channel




