पुणे: देशाला बदनाम करून कधीही सत्ता मिळणार नाही; पुण्यात अमित शाहंचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

पुणे: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत हल्लाबोल केला आहे. पुण्यात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी राहुल गांधींनी हैदराबाद येथील एका आंतरराष्ट्रीय संमेलनात केलेल्या विधानांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आणि निशाणा साधला.

अमित शाह यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करून कधीही सत्ता मिळणार नाही." तसेच, सलग निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवांमुळे काँग्रेस पक्षात प्रचंड हताशा आणि नैराश्य पसरले असल्याचा दावाही त्यांनी याप्रसंगी केला.

राहुल गांधींवर देशविरोधी विधानांचा आरोप या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, एका कार्यक्रमात डाव्या विचारांच्या आणि भारतविरोधी विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणण्यात आले होते. राहुल गांधींवर थेट ताशेरे ओढत शाह म्हणाले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने या परिषदेत उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय मंचावर भारतविरोधी विचार व्यक्त केले आणि संपूर्ण जगात देशाची प्रतिमा मलीन करण्याचे अत्यंत निंदनीय काम केले. पराभवाच्या फ्रस्ट्रेशनमधून असे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

यूपीए सरकारच्या काळातील घोटाळ्यांवर भाष्य यावेळी शाह यांनी काँग्रेसच्या यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळातील कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "देशातील जनतेने काँग्रेसला १० वर्षे पूर्ण संधी दिली होती. परंतु, त्या काळात १२ लाख कोटी रुपयांचे मोठे घोटाळे आणि भ्रष्टाचार झाले. देशातील जनतेने हा भ्रष्टाचार पाहिल्यानंतर काँग्रेसला सत्तेतून पूर्णपणे बाहेर कातले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सूत्रे दिली. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर एका पैशाचा किंवा भ्रष्टाचाराचा साधा आरोपही झालेला नाही."

मोदी सरकारच्या विकासकामांचे कौतुक नरेंद्र मोदी सरकारच्या कामांचे कौतुक करताना गृहमंत्री शाह म्हणाले की, गेल्या १२ वर्षांतील पारदर्शक कारभार आणि अभूतपूर्व विकासकामामुळे देशाचा कायापालट झाला आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक, जय आणि पराजय हे चालत असतात, परंतु राजकीय स्वार्थासाठी किंवा पराभवाच्या नैराश्यातून देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर डागळणे अत्यंत चुकीचे आहे, असे सांगत त्यांनी राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर व भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *