
G20 Summit : आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली जी20 शिखर परिषदेसाठी पूर्णतः सज्ज झाली आहे. पाहुणेमंडळींच्या खाण्यापिण्याच्या सोयीपासून ते त्यांच्या सुरक्षेशी संबंधित चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय यंत्रणांसह त्यांच्या स्वतःच्याही सुरक्षा यंत्रणा दिल्लीत तळ ठोकून आहेत.
दरम्यान दिल्लीच्या रस्त्यांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याच वाहनांचा सर्वात मोठा ताफा असेल, असे म्हटलं जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत सीक्रेट सर्व्हिसची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. कारण राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सीक्रेट सर्व्हिस एजेंट्सवर असते. राष्ट्राध्यक्ष परदेशी दौऱ्यावर असतानाही सीक्रेट सर्व्हिसकडेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते.
हेच सीक्रेट सर्व्हिस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना अभेद्य सुरक्षा पुरवणार आहेत. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष व्हिलियम मॅककिन्ले यांच्या हत्येनंतर वर्ष 1901नंतर सीक्रेट सर्व्हिसची सेवा सक्रिय झाली. या घटनेनंतर सीक्रेट सर्व्हिसकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यासंबंधीचे विधेयक वर्ष 1906 मध्ये संसदेनं मंजूर केलं होतं. बदलत्या काळानुसार सर्व्हिसमधील कार्याचा विस्तारही करण्यात आला.
|
MSRTC News : ST कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ |
सीक्रेट सर्व्हिस कोणकोणत्या स्वरुपात करते काम व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कशी पुरवते सुरक्षा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…
-
सुरक्षित अमेरिका व्हिजनचा एक भाग म्हणून सीक्रेट सर्व्हिस कायदा अधिकारी, शाळा सुरक्षा पार्टनर्स आणि विविध समुहांसह समन्वय साधत सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून सुरक्षा पुरवण्याचे कार्य करते.
-
-
एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरीद्वारे सीक्रेट सर्व्हिसकडेच या कार्यक्रमाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते.
-
देशातील प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या सुरक्षेतही याच सर्व्हिसची सेवा तैनात असते.
-
राष्ट्राध्यक्षांचा एखादा परदेश दौरा निश्चित झाल्यानंतर सीक्रेट सर्व्हिस तीन महिने आधीपासूनच त्यांच्या सुरक्षेचं नियोजन आखण्यास सुरुवात करतात.
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, व्हाइट हाऊस, अमेरिकीचे उच्च सुरक्षा अधिकारी आणि अमेरिकेला भेट देणाऱ्या हाय-प्रोफाइल नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे कार्य सीक्रेट सर्व्हिस करते.
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेथे कुठेही प्रवास करतात, त्यांच्यासोबत अमेरिकेतील सीक्रेट सर्व्हिसचे पथक सुरक्षेसाठी तैनात असतेच.
-
राष्ट्राध्यक्षांच्या आगमनापूर्वी कित्येक आठवडे आधीच हे पथक तेथे जाऊन सुरक्षेची खात्री करून घेतात. प्रत्येक गोष्टीची माहिती जाणून घेतात आणि आपल्या देशात परततात.
-
राष्ट्राध्यक्ष ज्या ठिकाणी वास्तव्य करणार असतात, तेथील रस्त्यांपासून ते राहत्या ठिकाणीच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था केली जाते.
-
राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याच्या जवळपास एक महिन्याभरापूर्वी अमेरिकी एजन्सीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक त्या-त्या ठिकाणांचा दौरा करतात. यानंतर दोन आठवड्यांनंतरही आणखी एक टीम तेथे पोहोचते.
-
या दोन्ही पथकांच्या रिपोर्टनंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे वाहन, अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसचे प्रशिक्षित श्वान या ठिकाणांचा दौरा करतात.
-
राष्ट्राध्यक्षांच्या दौरादरम्यान जवळपास 24 प्रशिक्षित श्वानांचा समावेश केला जातो.
सीक्रेट सर्व्हिसकडून इतक्या सूक्ष्म, शिस्तबद्ध व काटेकोर पद्धतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.
-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



