अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी घटना समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावात मुलीने आपल्याच जातीतील तरुणासोबत प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून नंदीवाले तिरमली जातपंचायतीने एका अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील गरीब कुटुंबाला वेठीस धरत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष प्रकारानंतर पीडित कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) मदतीने पोलिसांत धाव घेत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय आहे?
तक्रारदारांच्या माहितीनुसार, धामोरी येथे राहणारे भाऊसाहेब आनंदा अहिरे यांच्या सज्ञान मुलीने स्वतःच्या पसंतीने प्रेमविवाह केला. हा विवाह जातपंचायतीच्या जुनाट आणि मनमानी नियमांविरुद्ध असल्याचे सांगत पंचायतीने हा विवाह पूर्णपणे अमान्य केला. त्यानंतर जातपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी अहिरे कुटुंबाला एक लाख रुपयांचा अवाच्या सव्वा दंड ठोठावला. पीडित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, ते सुया-फण्या विकून किंवा रस्त्या कडेला असलेल्या पालामध्ये राहून आपली कशीबशी उपजीविका करतात. असे असतानाही त्यांनी नातेवाईकांकडून व इतरांकडून कर्ज काढून ५० हजार रुपयांची रक्कम जातपंचायतीला भरली.
दंडाची उर्वरित रक्कम न दिल्याने अमानुष बहिष्कार
पीडित कुटुंब अत्यंत गरीब असल्याने ते दंडाची उर्वरित पन्नास हजार रुपयांची रक्कम वेळेत देऊ शकले नाहीत. पैसे देऊ न शकल्यामुळे संतापलेल्या जातपंचायतीच्या पंचांनी या गरीब कुटुंबावर पूर्णपणे सामाजिक बहिष्कार टाकण्याचा अमानुष निर्णय घेतला.
या जातपंचायतीच्या तुघलकी फतव्यानुसार:
-
गावातील किंवा समाजातील कोणीही व्यक्ती अहिरे कुटुंबाशी बोलणार नाही.
-
त्यांच्या सुख-दुःखाच्या किंवा कोणत्याही प्रसंगात समाजातल्या कुणीही सहभागी व्हायचे नाही.
-
कुटुंबातील सदस्यांना त्यांच्याच मुलीला देखील भेटू दिले जात नाही.
-
धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये या कुटुंबाला पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
-
एवढेच नव्हे तर, जर या कुटुंबाशी कोणी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीलाही मोठा दंड ठोठावून जातीबाहेर काढण्यात येईल, असा दमही समाजात भरण्यात आला आहे.
पोलिसांत धाव आणि कारवाईची मागणी
या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी पीडित कुटुंबाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. त्यानंतर 'जातपंचायत मुठमाती अभियानाचे' राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि कोपरगाव अंनिसचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी पीडित कुटुंबाला सोबत घेऊन थेट कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यान्वये (Anti-Social Boycott Act) संबंधित जातपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे लिखित निवेदन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना देण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, अशा जाचक जातपंचायतींवर कठोर बडगा उगारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




