महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य चार सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल येत्या २८ फेब्रुवारी २०२६ पूर्वी प्रसिद्ध केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) नियमांनुसार, कोणत्याही विमान अपघातानंतर ३० दिवसांच्या आत प्राथमिक माहिती सादर करणे बंधनकारक असते. त्यानुसार एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ही संस्था या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे. या अहवालातून विमानाची तांत्रिक स्थिती, हवामानाचा अंदाज आणि वैमानिकाचे शेवटच्या क्षणांतील निर्णय यावर अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या अहवालाकडे केवळ राजकीय वर्तुळाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
अपघाताच्या दिवशी नक्की काय घडले?
२८ जानेवारी रोजी सकाळी ८:१८ वाजता विमानाचा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क झाला. सकाळी ८:४३ वाजता विमान उतरवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात विमान धावपट्टीच्या सुरुवातीलाच कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवारांचा पुतण्या आमदार रोहित पवार यांनी या अपघातात घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच वैमानिकाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ३००० फूट दृश्यमानता असतानाही विमान का कोसळले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही सोशल मीडियावरून सत्य समोर आलेच पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधील माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
अधिकृत अहवालातून स्पष्टीकरण मिळणार
दरम्यान या भीषण अपघाताने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. आता सर्वांच्या नजरा २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणाऱ्या AAIB च्या प्राथमिक अहवालाकडे लागल्या आहेत. यातून ब्लॅक बॉक्समधून मिळणारी विमानाची तांत्रिक माहिती आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचा शेवटचा संवाद, या प्रकरणातील संशयाचे धुके दूर करण्यास मदत करेल. हा अपघात निव्वळ एक तांत्रिक त्रुटी होती की त्यामागे आणखी काही गंभीर कारण दडलेले आहे, याचे उत्तर या अधिकृत अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
[embedded content]
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!


























Subscribe to my channel




