नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा

नांदेड: महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाबरोबरच ज्येष्ठा गौरीच्या (महालक्ष्मी) आगमनाने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे गौरीच्या पूजेसाठी मातीच्या सुंदर मूर्ती किंवा पत्री, मुखवटे वापरण्याची प्रथा आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील येइलवाड कुटुंबाने या परंपरेपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अत्यंत प्रेरणादायी मार्ग अवलंबत एक अनोखा पायंडा पाडला आहे. येइलवाड  मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना न करता आपल्या घरातील तीन स्रियांना (सुनांना) साक्षात देवी महालक्ष्मी म्हणजेच गौरीचा दर्जा देत त्यांची मनोभावे पूजा करण्याची अनोखी प्रथा गेल्या सहा वर्षांपासून अखंडितपणे सुरू ठेवली आहे.

या विशेष परंपरेमागे कुटुंबाची अत्यंत सखोल आणि आगळीवेगळी भावना आहे. येइलवाड कुटुंबाच्या मते, घरात आलेल्या स्रियांना किंवा सनांकडे केवळ लक्ष्मीचे रूप म्हणून पाहिले पाहिजे. स्रिया या खऱ्या अर्थाने घराची लक्ष्मी आणि कुटुंबाचा कणा असतात, त्यामुळे त्यांना मान सन्मान देणे आणि त्यांचे पूजन करणे हे मातीच्या मूर्तींच्या पूजेपेक्षाही श्रेष्ठ आहे, असा विचार करत त्यांनी ही परंपरा सुरू केली. यंदाच्या वर्षीही या ६ वर्षांच्या परंपरेची पुनरावृत्ती करत घरातील तीनही सुनांना गौरीच्या रूपात मखरात बसवण्यात आले. पारंपरिक पोषाख, दागिने आणि लक्षवेधी शृंगार करून या तिन्ही सुनांची अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने गौरीसारखी पूजा करण्यात आली.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे येइलवाड कुटुंबाच्या घरी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. स्रियांना कुटुंबात आणि समाजात मानाचे स्थान मिळवून देणारा हा कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींनी सुरु केलेल्या या सुंदर परंपरेमुळे सामाजिक सलोखा आणि कुटुंबातील प्रेम याविषयी एक उत्तम संदेश संपूर्ण समाजात जात आहे. मातीच्या मूर्तींचे विसर्जन होते, परंतु जिवंत माणसांमधील आणि विशेषतः घरातील लक्ष्मी असलेल्या स्रियांमधील देवत्व ओळखून त्यांचा आदर करणे ही खरी परंपरा असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा”

  1. Wonderul work! That is thee kind off information tjat aree mwant tto bee shaqred artound
    thee internet. Disgrace oon Google for nott positionong thius puut
    uup higher! Comee onn over annd visit my sijte
    . Thanks =) xnxx

    Visit my weeb bpog xxxx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *