अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात कैद होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून मिळालेल्या आर्थिक मदतीनंतर अखेर त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने मदत केलेल्या सेलिब्रिटींचे आभार मानले आहेत. राजपालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित लोकांना धन्यवाद म्हटलंय. त्याचसोबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या तुरुंगातील दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. इतकंच नव्हे तर राजपालने असंही म्हटलंय की जर या खटल्यात तो दोषी ठरत असेल तर तो पुन्हा तुरुंगात जायला तयार आहे.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राजपालने तुरुंगात कसा वेळ घालवला, याविषयीचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की तुरुंगात इतर कैद्यांना जे जेवण दिलं जात होतं, तेच त्याला मिळत होतं. आपली बाजू मांडताना राजपाल यादवने स्पष्ट केलं की, जर मी कोणाची फसवणूक केली असेल तर गेल्या दहा वर्षांत मला फिल्म इंडस्ट्रीत कामच मिळालं नसतं. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने चेक बाऊन्सबद्दल त्याने अधिक बोलणं टाळलं. या खटल्याबद्दल मुलाखतींमध्ये त्याच्याकडून जर काही चुकीचं बोललं गेलं, तर त्याला कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागेल, असं तो म्हणाला.
या मुलाखतीत राजपाल पुढे म्हणाला की, तो जसा दिवस येतोय, तसं जगण्याचा प्रयत्न करतोय आणि एक नवीन सुरुवात करतोय. तुरुंगात त्याने इतर कैद्यांप्रमाणेच सर्व नियमांचं पालन केलं आणि न्यायालयाच्या नियमांचंही पालन करत राहणार असल्याचं त्याने सांगितलं. “जर न्यायालयाला मी चुकीचा वाटलो, तर मला पुन्हा तुरुंगात पाठवा, मी त्याचा आदर करेन. मला एका वर्षात कमीत कमी दहा चित्रपट मिळाले आहेत. तर मी फसवणूक करणारा असतो, तर कोणीही माझ्यासोबत काम का केलं असतं? इंडस्ट्रीला हे सिद्ध करण्याची गरजच नाही की ते माझ्यासोबत आहेत, कारण इंडस्ट्रीने कायम माझं समर्थन केलंय. मला पूर्ण विश्वास आहे की प्रत्येकजण माझ्यासोबत आहे. मला मिळालेल्या मदतीचा मी आदर करतो, परंतु मला सहानुभूती नकोय”, असं राजपाल म्हणाला.
शहर
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
महाराष्ट्र
- पुण्यात भीषण आगीचा थरार! धनोरीत भंगार गोदामात ३ सिलिंडरचा स्फोट; धुराचे लोट ५ किमीवरून दिसत होते.
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- सीएमआर ग्रीन टेक'चा आयपीओ आजपासून खुला; ६३१ कोटींच्या संधीसह ग्रे मार्केटमध्ये ३३ टक्क्यांची दमदार तेजी!
गुन्हा
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.


























Subscribe to my channel


