पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:व्यक्तित्व उजळवण्याच्या‎ कलेचे नाव म्हणजे ‘विवेक’

आपला विवेक जागृत झाला, तर आपली भाषा सुखदायक, गंभीर‎आणि मधुर होईल. काकभुशुंडीजींनी श्रीरामांच्या वाणीबद्दल म्हटले‎होते—‘सुनि सप्रेम मम बानी देखि दीन निज दास, बचन सुखद गंभीर‎मृदु बोले रमानिवास.’ म्हणजेच माझी प्रेमळ वाणी ऐकून आणि‎आपल्या भक्ताला लीन झालेले पाहून श्रीराम अत्यंत सुखदायक, गंभीर‎आणि कोमल शब्दांत बोलले. श्रीराम कमी बोलायचे. पण बोलायचे,‎तेव्हा अर्थपूर्ण बोलायचे. त्यांच्या वाणीत हे तीन गुण होते. कारण त्यांचा‎विवेक जागृत होता. आता गणेशोत्सव सुरू झाला आहे. सरस्वती ही‎बुद्धीची देवी आहे, तर श्रीगणेश हे विवेक देणारे दैवत आहेत. विवेक‎जागवण्यासाठी स्वतःमधील कमतरता इतरांना सांगताना पूर्ण प्रामाणिक‎राहावे. या कमतरता दूर करण्यासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी कष्ट‎घ्यावे. लोकांकडून स्वतःबद्दल मोकळेपणाने अभिप्राय घेत राहू, तितके‎व्यक्तित्व उजळवणे सोपे होईल. याच प्रक्रियेला ‘विवेक’ म्हणतात.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *