छत्रपती संभाजीनगर: खेळण्या-बागडण्याच्या, निष्पापपणे हसण्या- खिदळण्याच्या आणि आई-वडिलांच्या कुशीत वाढण्याच्या कोवळ्या वयात काळाने एकाच घरातील दोन चिमुकल्या जीवांना अत्यंत निघृणपणे हिरावून नेले आहे. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील हसत्या-खेळत्या थोटे कुटुंबावर नियतीने असा क्रूर आघात केला आहे की, ज्यामुळे संपूर्ण गावासह परिसराचे काळीज पिळवटून निघाले आहे. मंगळवारी रात्री कुटुंबाने अत्यंत प्रेमाने एकत्र खाल्लेली खिचडी या परिवारासाठी अक्षरशः काळरात्र ठरली. या अन्नातून झालेल्या विषबाधेने आधी दोन वर्षांचा लाडका चिमुकला आयुष आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अवघ्या सहा वर्षांची बहीण गायत्री या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलग दोन दिवसांत आपल्या पोटच्या दोन्ही निष्पाप गोळ्यांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी आणि अमानुष वेळ एका हतबल पित्यावर ओढवली.
खिचडी खाल्ली अन् पहाटेपासून त्रासाला सुरुवात
चिंचोली लिंबाजी येथील रहिवासी नारायण साहेबराव थोटे (वय ३५) यांच्या घरात मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे चुलीवर स्वयंपाक झाला. पत्नी देवशाला (वय ३०), मुलगी गायत्री (वय ६ ते ७ वर्षे) आणि मुलगा आयुष (वय २ वर्षे) या चौघांनी एकत्र बसून रात्रीची खिचडी खाल्ली. मात्र, बुधवारी पहाटेपासूनच घरातील चारही सदस्यांना अचानक तीव्र उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर प्राथमिक औषधोपचार घेतले. मात्र, गुरुवारी पहाटे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दोन्ही लहान मुलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली.
सिल्लोडला नेताना आयुषने प्राण सोडले; पित्याचा हंबरडा
गुरुवारी पहाटे आयुष आणि गायत्री यांना गावातील खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तातडीने सिल्लोड येथे हलवण्याचा सल्ला दिला. परंतु दुर्दैवाने, सिल्लोडकडे घेऊन जात असताना वाटेतच गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अवघ्या दोन वर्षांच्या आयुषची प्राणज्योत मालवली. ज्या चिमुकल्याच्या हातावर खेळणी खेळायची वेळ होती, त्याच्या निष्पाप पार्थिवाला जड अंतःकरणाने गुरुवारी दुपारी १२ वाजता अग्नी देण्याची वेळ हतबल पिता नारायण थोटे यांच्यावर आली.
दुसऱ्या दिवशी लेकीनेही सोडले प्राण; गावात शोककळा
एका मुलाला अग्नी दिल्यानंतर अश्रू कोरडे होत नाहीत तोच नियतीने थोटे कुटुंबावर दुसरा आघात केला. मृत्यूशी झुंज देणाऱ्या लाडक्या गायत्रीला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, परंतु शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तिचीही प्राणज्योत मालवली. एकापाठोपाठ दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने आई, वडील आणि आजीने फोडलेल्या हंबरड्याने स्मशानभूमीतील प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले. आई-वडिलांची प्रकृती उपचारांनंतर धोक्याबाहेर आली असली, तरी घरातले हसते-खेळते जगच उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण चिंचोली लिंबाजी गावावर शोककळा पसरली आहे.
फॉरेन्सिक व अन्नसुरक्षा पथकाकडून नमुने जप्त
या गंभीर घटनेची माहिती मिळताच अन्नसुरक्षा अधिकारी एम. एल. सिद्दीकी, पिशोर पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात तयार करण्यात आलेल्या अन्नाचे, धान्याचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे डेंग्यूमुळे १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. आता अन्नातील विषबाधेने दोन बालकांचा बळी गेल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




