दिल्लीतील नामांकित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या(एसआरसीसी) शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांचीउपस्थिती म्हणजे प्रत्यक्षात पुढील वर्षी उत्तर प्रदेश,गुजरात, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, मणिपूर आणिगोव्यात होणाऱ्या निवडणुकांचे ‘कर्टेन रेझर'' मानले जाऊशकते. पंतप्रधान देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांच्या समूहालासंबोधित करत होते. पण निवडणुकांत तरुण जेन-झीआणि अगदी जेन-अल्फाचेही महत्त्व स्वीकारण्यासारखेहोते. देशाच्या राजकीय पटलावर या तरुणांनी कायस्थान मिळवले आहे, हे मोदी चांगल्या प्रकारे जाणतात.आज कोणताही पक्ष त्यांना दुर्लक्षित करण्याचा धोकापत्करू शकत नाही. म्हणूनच राहुल गांधी ‘छात्रों कीगूंज’ हा उपक्रम चालवत आहेत, तर पंतप्रधान एसआरसीसीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. निवडणुकीचे राज्य मोठे असो वा छोटे, लोकसभा निवडणुकीवरील त्याच्या प्रभावामुळे सत्ताधारी वविरोधक दोघांसाठीही ते महत्त्वाचे आहे. आगामी निवडणुकांत भाजपसाठी बऱ्याच गोष्टी पणाला लागल्या आहेत. बंगालमधील विजयाने भाजपच्या बाजूने जोरदार वातावरण निर्माण केले होते. मात्र, जेन- झीच्याआंदोलनानंतर पक्षाची लय बिघडल्यासारखी वाटूलागली. अशा स्थितीत मोठी राज्ये हातातून निसटली,तर ती भाजपसाठी अजिबात अनुकूल स्थिती नसेल.गोव्यात 2012 पासून भाजपची सत्ता आहे. तिथेअँटी-इन्कम्बेंसीचे परिणाम दिसू लागला आहेत . तरीहीइतर राज्यांप्रमाणेच गोव्यातही काँग्रेसने गैर-भाजपपक्षांशी आघाडी करण्यात फारसा रस दाखवलेला नाही.गेल्या निवडणुकीत 10% मते मिळवणाऱ्या आणि‘जेन-झी''च्या हिताची भाषा करणाऱ्या ‘रिव्होल्युशनरीगोअन्स पार्टी'' या नव्या पक्षाशी काँग्रेस चर्चा नक्कीचकरत आहे. परंतु ''गोवा फॉरवर्ड पार्टी''सोबतची आघाडीकायम ठेवण्यात किंवा ‘आम आदमी पार्टी''सोबतजुळवून घेण्यात तिने उत्सुकता दाखवलेली नाही.पंजाबच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी, काँग्रेस,शिरोमणी अकाली दल, भाजप आणि अमृतपाल सिंगयांच्या नेतृत्वाखालील खालिस्तानसमर्थक अकाली दल(वारिस पंजाब दे) यांच्यात पंचकोनी लढत होऊशकते. अमृतपाल 2023 पासून तुरुंगात आहेत. भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र आले, तर हाचौकोनी सामना ठरेल. या आघाडीची शक्यता नाकारतायेत नाही. कारण सुखबीर बादल काही वेळापूर्वीचपंतप्रधानांना भेटले होते. राजकीय वर्तुळात या भेटीलादाखवण्यापुरते म्हटले गेले. दोन्ही पक्षांना ही आघाडीहवी आहे, पण ते सोपे नसेल. जागांसाठी भाजपच्याकडक घासाघिशीमुळे अकाली दलाचे काही नेते आणिकार्यकर्ते ‘वारिस पंजाब दे''च्या बाजूने जाऊ शकतात.राज्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या समस्येचा सामनाकरण्यासाठी भाजपने सप्टेंबरमध्ये ‘नशा मुक्ती यात्रा’काढण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत अकालीदलासोबतची त्यांची आघाडी या मोहिमेच्याविश्वासार्हतेला तडा देऊ शकते. दुसरीकडे, आप सत्तावाचवण्यासाठी धडपडत आहे. एकदा वरचढ दिसणारीकाँग्रेस सध्या दुभंगली आहे. या निवडणुकीच्यारणधुमाळीत अमृतपाल सिंग यांची सुटका झाली, तरराजकीय चित्र आणखी विस्कळीत होईल आणि आपण‘किंगमेकर’ म्हणून पुढे येऊ, अशी आशा भाजपलावाटत आहे. मात्र, मोठी राजकीय लढाई उत्तर प्रदेशातलढली जाणार आहे. या राज्यातील 80 लोकसभा जागात्याला इतर राज्यांपेक्षा वेगळे आणि महत्त्वाचे स्थानदेतात. भाजपने 2014 मध्ये इथे 71 आणि 2019 मध्ये 62जागा जिंकल्या नसत्या किंवा नरेंद्र मोदींनी वडोदरा सोडूनवाराणसीद्वारे युपीला आपली कर्मभूमी बनवले नसते, तरआज राष्ट्रीय राजकारणातील भाजपचा प्रवास खूपवेगळा असता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांच्यासाठीही ही मोठी पणाला लागलेली लढाई आहे. तेतिसऱ्यांदा युपीचे मुख्यमंत्री झाले, तर मोदींनंतरच्याकाळात देशाच्या सर्वोच्च पदाच्या दावेदारात तेआघाडीवर असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातीलअनेकांचा पाठिंबा योगींना आहे. युपीबाहेरही त्यांचा मोठासमर्थक वर्ग आहे. उदाहरणार्थ, त्यांच्या ताज्या तिरुपतीदौऱ्यात तेथील लोकांनी अत्यंत उत्साहात त्यांचे स्वागतकेले होते. ब्रिटनच्या ‘फायनान्शियल टाइम्स’च्या एकाअहवालात तर योगींचा उल्लेख नरेंद्र मोदींचे संभाव्यवारसदार म्हणूनही करण्यात आला आहे! (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) निवडणुकीचे राज्य मोठे असो वा छोटे, 2029च्या लोकसभा निवडणुकीवरील प्रभावामुळेसत्ताधारी व विरोधक दोघांसाठीही त्याचे महत्त्वआहे. आगामी निवडणुकांत विशेषतःभाजपसाठी खूप काही पणाला लागले आहे.त्यामुळे मोठी राज्ये हातून निसटू देण्याची चूकभाजप नक्कीच करणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




