जालना/अंतरवली सराटी: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) आणि प्रलंबित मागण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा कमालीचा तापला असून सरकारकडून तोडगा काढण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ३० मे २०२६ पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, जरांगे यांनी दिलेल्या निमंत्रणाचा मान ठेवून भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड हे आज (शुक्रवार, २२ मे) स्वतः अंतरवली सराटी येथे दाखल झाले. अत्यंत तणावपूर्ण आणि राजकीय घडामोडींनंतर झालेल्या या थेट चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद झाला, तर काही प्रसंगी आमदार लाड ऑन-कॅमेरा भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारकडे १० प्रमुख मागण्या चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या कल्याणासाठी आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे १० प्रमुख मागण्यांची अधिकृत यादी सुपूर्द केली आहे. यामध्ये खालील मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे: १. सध्याची मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी. २. मराठा आणि कुणबी समाजाच्या स्वतंत्र विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. ३. 'सगेसोयरे' अध्यादेशाची अंमलबजावणी करून कुणबी नोंदी आढळलेल्यांच्या रक्ताच्या नात्यातील सर्वांना प्रमाणपत्रे द्यावीत. ४. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण लागू करावे. ५. सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अतिरिक्त निधी पुरवण्यात यावा.
मी तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन - प्रसाद लाड अंतरवली सराटीत पोहोचल्यानंतर प्रसाद लाड यांनी मराठा समाजाच्या लढ्यात मनोज जरांगे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. लाड म्हणाले, "आमच्यात भूतकाळात अनेकदा राजकीय वाद झाले आहेत, हे मला मान्य आहे. मात्र, जरांगे यांनी दिलेल्या लढ्यामुळेच माझ्या समाजाला न्याय मिळाला, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी येथे कोणताही आमदार किंवा नेता म्हणून आलेलो नाही, तर समाजाचा एक सामान्य माणूस आणि तुमचा लहान भाऊ म्हणून आलो आहे." ३० मे ही तारीख बदलून उपोषण न करण्याची विनंती त्यांनी केली. कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस असून जरांगे यांच्या प्रकृतीची सर्वांना काळजी आहे. हे सर्व १० मुद्दे आपण स्वतः 'सरकारचे दूत' म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून त्यावर सभागृहात तात्काळ मार्ग काढू, अशी ग्वाही लाड यांनी दिली.
भेटीपूर्वी धमकीचा फोन; जरांगेंकडून निषेध या अत्यंत महत्त्वाच्या भेटीपूर्वी एक मोठी खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. आमदार प्रसाद लाड हे हॉटेलमध्ये थांबले असताना त्यांच्या पीएला धमकीचा फोन आला होता आणि दोन संशयित तरुणांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या प्रकरणी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "धमकी देणारे कोण आहेत मला माहीत नाही, पण अशा हल्ल्याचे किंवा धमकीचे समर्थन होऊ शकत नाही. आपल्या बांधवांनी गेली पौणे तीन वर्षे अतिशय शांततेने आंदोलन केले आहे, त्यामुळे मराठा समाजाला गालबोट लागेल असे वर्तन कोणीही करू नये." जरांगे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी लाड यांच्यावर विश्वास ठेवला असून आता तोडगा काढण्याची धुरा पूर्णपणे प्रसाद लाड यांच्या खांद्यावर आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
- महाराष्ट्र: शरद पवार गटाला खिंडार! तीन आजी-माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!



























Subscribe to my channel




