बोरिया मजुमदार यांचा कॉलम:क्रिकेटमधील स्वतःच्या दुर्दशेस ‎पाकिस्तान स्वत:च जबाबदार‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मध्येच‎पाकिस्तानने घाईघाईत असा काही निर्णय घेतला की‎विचारूच नका. त्यांनी सात खेळाडूंना माघारी धाडले‎आणि प्रशिक्षकांना हटवले. जणू ते खेळाडूंना धडा‎शिकवण्याचा एक वस्तुपाठच घालून देऊ इच्छित होते.‎आता बाबर आझम ऑन-रेकॉर्ड सांगतो की, त्याला या‎निर्णयांची काही माहितीच नव्हती. मग शेवटी पीसीबीने‎या खेळाडूंना घरी पाठवून कसला आदर्श समोर‎ठेवायचा होता? अपमान, गैरवर्तनाचा? आणि त्यांच्या‎कृतीने पाकिस्तानच्या इतर खेळाडूंना काय संदेश जातो?‎ खेळाडू आणि प्रशिक्षकांवर तर कुऱ्हाड कोसळत आहे,‎पण अधिकाऱ्यांचे काय? त्यांच्याबद्दल एक शब्दही का ‎‎बोलला जात नाही? ते जबाबदार का नाहीत? त्यांच्यावर ‎‎कोणी एक प्रश्नही विचारणार नाही. ते काही घडलेच‎नाही अशा आविर्भावात काम करत राहतील, हे कसे‎शक्य आहे? सत्य हेच आहे की खेळाडू हे सोपे लक्ष्य‎आणि केवळ मोहरे आहेत. पीसीबी त्यांच्याशी अनादराने ‎‎वागून सहजरित्या सुटू शकते. आणि ते सत्तेच्या ठिकाणी ‎‎असल्यामुळे त्यांना आव्हान देण्याची हिंमत कोणी‎करणार नाही. पाकिस्तानातील क्रिकेट आणि तिथले ‎‎क्रीडाविश्व हे क्रीडा प्रशासनाची सूत्रे सांभाळणाऱ्या ‎‎राजकीय वर्गाच्या अहंकाराचा बळी ठरले आहे.‎खेळाडूंनीही या मालिकेत चांगली कामगिरी केलेली‎नाही हे खरे आहे. पण तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये बसून हे‎ऐकत असाल की क्रिकेट बोर्ड सामना व मालिकेवर‎बहिष्कार टाकण्याची धमकी देत आहे, तर तुम्ही‎कोणत्या मानसिक स्थितीत खेळ सुरू ठेवाल? तुम्ही‎स्वतःच्या खेळावर लक्ष कसे केंद्रित करू शकाल?‎सलमान आगाचेच उदाहरण घ्या. त्याला पहिल्या‎कसोटीत ऐनवेळी कर्णधारपद सांभाळायला सांगितले‎गेले आणि दुसऱ्या कसोटीत थेट संघातून बाहेर काढले‎गेले. आता तिसऱ्या कसोटीपूर्वी त्याला घरी रवाना केले‎आहे. हे अतिशय हास्यास्पद आहे. तुम्ही इंग्लंडमधील‎एका कसोटी सामन्याच्या आधारे एखाद्या खेळाडूचे‎मूल्यांकन कसे करू शकता? तेही शेवटच्या क्षणी‎त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली‎गेली होती तेव्हा हे घडले. पाकिस्तानमध्ये खूप‎काळापासून हेच चालू राहिले आहे. खूप काळापासून‎खेळाडू आणि समालोचक गप्प राहिले. शेवटी आता‎आपल्याला प्रभावी व्यक्ती आवाज उठवताना दिसतात.‎माजी खेळाडूंना आता बोलावेच लागेल, कारण शेवटी‎नुकसान फक्त खेळाचेच होत आहे. खेळाडूंना परत‎पाठवले गेले आहे. ते अपमानित होऊन घरी परततात.‎त्यांचे भविष्य अनिश्चित दिसते. इंग्लंडमध्ये खेळणाऱ्या‎‌खेळाडूंना तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला‎वेळच मिळालेला नाही. अशा स्थितीत संघ‎मानसिकदृष्ट्या पार खचून जाणे स्वाभाविक आहे.‎ आणि मोठी गोष्ट ही आहे की, या सर्व घटनांना‎पाकिस्तानच्या ‘फेल्ड-स्टेट'' असण्याशी जोडले जाऊ‎शकते. खेळ हे त्याचे केवळ आणखी एक रूप आहे.‎सर्वत्र परिस्थिती भयानक आहे. आशेचा किरण ठरेल‎असा एकही खेळाडू उरलेला नाही. तिथे प्रत्येक गोष्टीवर‎राजकारण हावी झाले आहे. प्रत्येक स्तरावरील हस्तक्षेप‎आणि नियंत्रणाने पाकिस्तानच्या खेळाची पार वाट‎लावली आहे. क्रिकेट संघ हे या गोष्टीचे केवळ एक‎उदाहरण आहे की असा राजकीय हस्तक्षेप काय करू‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎शकतो. सर्व खेळाडूंना दोषी ठरवले जाते. पण खरेच‎त्यांची चूक आहे का? पाकिस्तानच्या या अधोगतीची‎सर्व जबाबदारी त्यांच्यावर ढकलून बाकीच्या गोष्टींवर‎पडदा टाकला जाऊ शकतो का? एक मोठा प्रश्न आहे.‎आज पाकिस्तानात खेळामध्ये सतत हस्तक्षेप करणाऱ्या‎राजकारण्यांवर किती लोक बोट दाखवतील? या‎पुढाऱ्यांनी पाकिस्तान क्रिकेटला या अवस्थेत आणून‎सोडले. ही एका संपूर्ण व्यवस्थेची निष्फळता आहे. ही‎संपूर्ण यंत्रणाच मोडून पडली आहे. ही एक अशी निष्प्राण‎राज्य-व्यवस्था आहे. तेथे खेळाला काहीच महत्त्व‎उरलेले नाही. लॉर्ड्सवर पाकिस्तानी संघाने केलेले‎शरणागतीचे प्रदर्शन आणि हॉकीमधील त्यांची झालेली‎दुर्दशा यामागचे कारण हेच आहे. सध्या तरी एक देश‎म्हणून पाकिस्तानची हीच कहाणी आहे आणि यात‎लवकरच काही बदल होईल असे संकेत देणारी‎कोणतीच गोष्ट दिसत नाही. तोपर्यंत क्रीडाप्रेमी व‎खेळाडू मोठ्या राजकीय अहंकाराचे बळी ठरतील.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ पाकिस्तानमध्ये सर्वत्र परिस्थिती‎भयानक आहे. सर्वच गोष्टींवर‎राजकारणाचे वर्चस्व आहे. प्रत्येक‎स्तरावरील हस्तक्षेप व नियंत्रणाने‎पाकिस्तानच्या खेळाची पार वाट लावली‎आहे. क्रिकेट संघ हे या गोष्टीचे केवळ‎एक उदाहरण आहे की खेळातील असा‎राजकीय हस्तक्षेप काय करू शकतो.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *