पुणे: प्रशासकीय अनास्था, रखडलेले रस्ते यामुळे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या दुर्दैवी अपघातात एका निष्पाप चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला. हा अपघात आहे की, मनपा प्रशासनाकडून झालेला 'प्रशासकीय खून'? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
कात्रज-कोंढवा रोडवरील सिल्वर ओक सोसायटीच्या समोर दुचाकी (MH12-ZM 3579) व कंटेनर (HR 38 W 6977) मध्ये झालेल्या अपघातात प्रतिभा ज्ञानेश्वर नाईक (वय १६) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर वैष्णवी ज्ञानेश्वर नाईक या विद्यार्थिनीचे मांडीचे हाड फॅक्चर असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रतिभा व वैष्णवी नाईक या दोघी बहिणी असून, राजस सोसायटी येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी विद्यालयात दहावी वर्गात शिकत आहेत. वडील ज्ञानेश्वर नाईक हे आपल्या दुचाकीवरून शाळेतून घरी जात असताना हा गंभीर अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या सहा. पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात व वाहतूक विभागाचे प्रशांत खेडकर घटनास्थळी पोहोचले. प्रतिभा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून येथे पाठवण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अपूर्ण उड्डाणपूल, आणि कोणतीही शिस्त नसलेली अवजड वाहतूक यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी रोज मृत्यूचा सापळा ठरत आहे. दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून प्राणाची बाजी लावून प्रवास करतात. जबाबदार अधिकाऱ्यांचे डोळे उघडायला आणखी किती बळी जावे लागणार आहेत?
आज (दि. ८) झालेल्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला. केवळ अपघाताचा गुन्हा नोंदवून चालणार नाही, तर हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. भूसंपादनाचे कारण पुढे न करता महापालिकेने हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी देखील मागणी होत आहे. दहावीतील लहान मुलगी गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
ज्ञानेश्वर नाईक हे मूळचे नांदेडचे असून पुण्यातील एका खासगी शाळेत ते वॉचमनचे काम करतात. कात्रज परिसरातील गुजरवाडी फाटा येथे राहत असून, त्यांना एकूण चार मुली आहेत. दहावीला असणाऱ्या दोन मुलींना घरी घेऊन जाताना अपघात झाला व एकीचा जागेवर मृत्यू झाला. इतर दोन मुली या इयत्ता चौथी व इयत्ता सातवीमध्ये शिकत आहेत. त्यांच्या पत्नी देखील एका खासगी कंपनीत काम करतात. जखमी असलेल्या वैष्णवीचे ऑपरेशन करावे लागणार असल्याची माहिती मिळाली. अतिशय गरीब असणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
"कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिशय मनमानी कारभार सुरू असून, ना स्पीड ब्रेकर, ना वाहतूक पोलिस वाहनचालक कुठूनही कसेही उलटी सुलटी वाहने घेऊन जातात. कोणालाही कशाचीच भीती नाही, एवढा मोठा चौक असताना कोणीही ट्रॅफिकवाले तिथे ट्रॅफिक कंट्रोलला नसतात. त्यामुळेच आज एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला. अरविंद मोरे, नागरिक."
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




