
लंडन : राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्यारोहणाबाबत ब्रिटनमधील भारतीयांमध्येही उत्सुकता व्यक्त होत असून पंतप्रधानपदावर भारतीय वंशाचेच ऋषी सूनक विराजमान असल्याने या भव्य समारोहामध्ये भारतीय वंशियांचा सहभाग दिसणार आहे.
मात्र, भारतात ब्रिटिशराज असल्यापासून राजसत्तेच्या कार्यक्रमांमध्ये भारतीयांचा सहभाग असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. ही पद्धत व्हिक्टोरिया राणीने सुरु केली असून राजघराण्याने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना राणीच्या सुरक्षा रक्षकांमध्ये भारतीय सैनिकांचा समावेश असायचा, असे इतिहासकार-लेखिका शर्बानी बसू यांनी सांगितले.
व्हिक्टोरिया या १८३७ ते १९०१ या कालावधीत ब्रिटनच्या राणी होत्या. बकिंगहॅम पॅलेस या महालाला आपले निवासस्थान बनविणाऱ्या त्या पहिल्या सम्राज्ञी होत्या. याच बकिंगहॅम पॅलेसमधून (ता. ६) राजे चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिला यांची राजबग्गी राज्यारोहण सोहळा होणाऱ्या वेस्टमिन्स्टर ॲबेच्या दिशेने जाणार आहे. या समारोहात ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांना निमंत्रण आहे.
मात्र, राजघराण्याने आयोजित केलेल्या समारंभांमध्ये राणी व्हिक्टोरियाच्या काळापासून भारतीयांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या पुस्तकाच्या लेखिका शर्बानी बसू यांच्या माहितीनुसार, व्हिक्टोरिया राणीला भारताबद्दल विशेष प्रेम होते. राणीने भारताला कधीही भेट दिली नसली तरी निकटचा सहकारी अब्दुल करीम याच्यामुळे त्यांना भारताबद्दल विविध माहिती मिळत होती.
राणी व्हिक्टोरिया यांना भारताबद्दल विशेष प्रेम असल्याने बकिंगहॅम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर ॲबे या दरम्यान निघणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीत राणीच्या रक्षक दलांमध्ये भारतीय सैनिकांचेही दल निश्चित असायचे.
आता परिस्थिती बदलली असली तरी राजघराण्याच्या सोहळ्यांशी भारतीयांच्या संबंधांचा दुवा दोनशे वर्षांनंतरही कायम असल्याचे बसू यांचे म्हणणे आहे. (ता. ६) होणाऱ्या राज्यारोहण समारोहात ब्रिटिश एम्पायर मेडल मिळालेल्या भारतीय वंशाच्या शेफ मंजू माल्ही यांच्यासह अनेक भारतीय वंशाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शहर
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- मुंबई: ७ कोटी फ्लॅटधारकांसाठी मोठा निर्णय! आता प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' महसूल विभागाचा मसुदा जाहीर
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: जात वैधता प्रमाणपत्र आता पूर्णपणे ऑनलाइन! राज्य सरकारचा मोठा निर्णय; वाचा संपूर्ण प्रक्रिया, नियम आणि शुल्क
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




